ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 21 : येथील मध्यवर्ती भागात अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एक पोलीस अधिकारी ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात हल्लेखोरही ठार झाला. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून, मध्यवर्ती भागात हेलिकॉप्टरद्वारे गस्त घालणे सुरू आहे. फ्रांसमध्ये अध्यक्ष पदाची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. हल्लेखोराचा हेतू आज स्पष्ट होत नसला तरी त्याने जाणीवपूर्वक पोलिसांना लक्ष्य केले होते. कारमधून उतरलेल्या हल्लेखोराने मशिनगणने गोळीबार केल्याचे सूत्रांनी सांगीतले.