Permission denied to McDonald woman wore hijab headscarf | हिजाब घातल्याने महिलेला मॅकडॉनल्डमध्ये नाकारली परवानगी

ठळक मुद्देघडलेल्या प्रकाराबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत - मॅकडॉनल्ड अधिकारी कपड्यांवरून कोणत्याही ग्राहकाला रोखण्याचा आमच्याकडे कोणताच नियम नाही - मॅकडॉनल्ड अधिकारी तिथं कपड्यांवरून भेदभाव झाल्याने मी स्वत: चकित झालेय - महिला

नॉर्थ लंडन : मॅकडॉनल्डच्या एका शाखेत एका हिजाब घातलेल्या महिलेला प्रवेश नाकारण्यात आला होता. हिजाब काढल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळणार नाही असं मॅकडोनल्डच्या सुरक्षा रक्षकाने त्या महिलेला सांगतिलं. या प्रकारानंतर अनेकांनी मॅकडॉनल्डच्या कारभारावर टीका केली. त्यामुळे आता त्यांनी माफी मागितली आहे. 

नॉर्थ लंडनच्या एका सेव्हेन सिस्टर्स रोडवर हे मॅकडोनल्ड आहे. हा सगळा प्रकार एका कॅमेऱ्या कैद झाला होता. शुक्रवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनुसार एक सुरक्षा रक्षक हिजाब घातलेल्या एका महिलेला सतत हिबाज काढून आत जाण्यास सांगत होता. मात्र महिलेने हिजाब काढण्यास मनाई केली.तेव्हा त्या सुरक्षा रक्षकाने तेथून जाण्यास सांगितलं. हिजाब हे पारंपारिक वेशभुषा आहे. कोणी काय घालावं, यावर कोणीही निर्बंध आणू शकत नाही. कोणत्याही ठिकाणी हिजाबला बंदी नसतानाही असा प्रकार घडल्याने लोकांनी मॅकडॉनल्डवर टीकास्त्र सोडलं आहे.


आर.टी.डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ती महिला म्हणाली की, ‘माझ्यासोबत घडलेला हा प्रकार हा एक गुन्हा आहे. मी गेल्या १९ वर्षांपासून इथे राहत आहे. गेल्या १९ वर्षांतला हा पहिलाच प्रकार आहे, जिथं कपड्यांवरून भेदभाव करण्यात आला आहे. असा भेदभाव झाल्याने मी स्वत: चकित झालेय. आजही आपल्याकडे असा दुजाभाव केला जातो याचंच मला फार आश्चर्य वाटतंय.’ 

हा प्रकार तिकडच्या अनेक माध्यमांनी उचलल्यावर मॅकडॉनल्डने संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करू असे सांगितलं आहे. तसंच, कपड्यांवरून कोणत्याही ग्राहकाला रोखण्याचा आमच्याकडे कोणताच नियम नाही. उलट, आम्ही प्रत्येक जाती-धर्मातील ग्राहकाला आमच्या प्रत्येक शॉपमध्ये आदरानेच वागवतो. त्यामुळे सेव्हेन सिस्टरर्सच्या ब्रँचमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं मेकडॉनल्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.जाती-धर्मातील पेहरावावरून कोठेही निर्बंध नसताना लंडनमध्ये घडलेला हा प्रकार धक्कादायकच आहे. शिवाय सुशिक्षितांच्या देशातच जर कपड्यांवरून एखाद्याची रोखण्यात येत असेल तर इतर ठिकाणी जाती-धर्मांवरून किती भेदभाव होत असतील याची गणती न केलेलीच बरी. 

आणखी वाचा - नाताळनिमित्त गोव्यातील हॉटेल बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर


Web Title: Permission denied to McDonald woman wore hijab headscarf
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.