धरणासाठी त्यानं दिले 8 कोटींचं दान; आता होणार मेडिकल चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 11:38 AM2018-11-13T11:38:58+5:302018-11-13T11:44:45+5:30

पाकिस्तानमधल्या एका व्यक्तीनं धरणासाठी 8 कोटींचं दान केलं आहे.

pakistan man donates property worth rs 80 million to dam fund court orders his medical check up | धरणासाठी त्यानं दिले 8 कोटींचं दान; आता होणार मेडिकल चौकशी

धरणासाठी त्यानं दिले 8 कोटींचं दान; आता होणार मेडिकल चौकशी

Next

इस्लामाबाद- पाकिस्तानमधल्या एका व्यक्तीनं धरणासाठी 8 कोटींचं दान केलं आहे. पाकिस्तानमधल्या शेख शाहिद नावाच्या व्यक्तीनं धरणासाठी 80 मिलियन रुपये(आठ कोटी) दान करण्याचा निर्णय घेतला. एवढं मोठं दान केल्यानंतर कुटुंबीयांतील व्यक्ती रागावणं साहजिकचं आहे. परंतु या व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे.

या प्रकरणात शेख शाहिद या व्यक्तीच्या पत्नी आणि तीन मुलांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. शेख शाहिद यांनी आमच्या परवानगीशिवाय संपत्ती दान केल्याचं त्यांची पत्नी आणि तीन मुलांनी सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं शेख शाहिद यांच्या मेडिकल चेकअपचे आदेश दिले आहेत. न्यायालयानं दान करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला विचारलं, तुमचे पतीबरोबर चांगलं नातं होतं का, तेव्हा तिनं हो असं उत्तर दिलं. ती म्हणाली, माझे पती मानसिकदृष्ट्या ठीक नाहीत. त्यामुळेच त्यांनी असं पाऊल उचललं असावे.

शरिया कायद्यांतर्गत त्यांची संपत्ती दान स्वरूपात स्वीकारली जाणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांच्या मेडिकल चौकशीचेही आदेश दिले आहेत. खरं तर पाकिस्तानमध्ये पाणी संकटांचा सामना करणं अवघड आहे. त्यामुळे तो प्रश्न सोडवणं हे सरकारपुढचं मोठं आव्हान आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही देशात धरण बांधण्यासाठी परदेशात असलेल्या पाकिस्तान नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. 

Web Title: pakistan man donates property worth rs 80 million to dam fund court orders his medical check up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.