नियंत्रण रेषेजवळ भारताचे विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावा

By ऑनलाइन लोकमत on Wed, March 07, 2018 11:32am

पाकिस्तानी लष्कराने भारताचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केला आहे. नियंत्रण रेषेजवळ हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यामुळे तात्काळ कारवाई करुन हे ड्रोन विमान पाडण्यात आले.

नवी दिल्ली -  पाकिस्तानी लष्कराने भारताचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केला आहे. नियंत्रण रेषेजवळ हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यामुळे तात्काळ कारवाई करुन हे ड्रोन विमान पाडण्यात आले असे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. भारताचे ड्रोन विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून हेरगिरी करत होते.

त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील चिरीकोट गावाजवळ हे विमान पाडण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने या विमानाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत असे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. मागच्या वर्षभरात भारताचे चौथे ड्रोन विमान पाडण्यात आल्याचे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. भारताने यावर लगेचच कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.                                                                

 

संबंधित

देशाचा कारभार हाकण्यास सरकारकडे पैसा नाही : इम्रान खान
तीन वर्षे आतंकवाद्यांचा केला दटून सामना
Asia Cup 2018 : बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली, श्रीलंकेबरोबर सलामीची लढत
Asia Cup 2018: यंदाचा आशिया चषक पाकिस्तान जिंकेल, सुनील गावस्करांचे भाकित
Asia Cup 2018 : सानिया मिर्झासाठी पती शोएब मलिकचा नवा लुक

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

टाईम मॅगझीनची पुन्हा विक्री; सॉफ्टवेअर कंपनी 1,368 कोटींना विकत घेणार
अमेरिका अन् चीनला वादळाचा तडाखा, 60 जणांचा मृत्यू
देशाचा कारभार हाकण्यास सरकारकडे पैसा नाही : इम्रान खान
जपानमध्ये शतायुषी लोक ६९,७८५; दोन दशकांत शतायुषी होण्याच्या प्रमाणात सातपट वाढ
‘शेतकऱ्यांना सबसिडीचे भारताचे धोरण हानिकारक’

आणखी वाचा