फ्रान्समध्ये 800 वर्षं जुना प्रसिद्ध चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:21 AM2019-04-16T01:21:26+5:302019-04-16T01:21:37+5:30

फ्रान्समधील सर्वात जुनं आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोट्र-डाम कॅथेड्रल या चर्चमध्ये आग लागली आहे.

The Notre Dame Cathedral In Paris Is On Fire | फ्रान्समध्ये 800 वर्षं जुना प्रसिद्ध चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी

फ्रान्समध्ये 800 वर्षं जुना प्रसिद्ध चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी

Next

पॅरिस- फ्रान्समधील सर्वात जुनं आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोट्र-डाम कॅथेड्रल या चर्चमध्ये आग लागली आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी चर्चची पूर्ण इमारत सापडली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या चर्चचं नूतनीकरण सुरू होतं. त्यामुळेच ही आग लागली असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही चर्चची इमारत 850 वर्षं जुनी आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीमुळे चर्चचं छत पूर्णतः कोसळलं आहे. गेल्या वर्षी हेच चर्च वाचवण्यासाठी लोकांना आर्थिक मदतीचं आवाहनही करण्यात आलं होतं.

चर्चची इमारत फारच जुनी असल्याकारणानं मोडकळीस आली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते म्हणाले, सर्वच ख्रिश्चन लोकांबरोबर आमच्या संवेदना जोडलेल्या आहेत. या दुर्घटनेमुळे मला अतीव दुःख झालं आहे. मी पूर्ण देशवासीयांच्या वतीनं आज दुःखी आहे. मला हे चित्र पाहून फारच त्रास होतोय. आपला एक भाग आगीच्या विळख्यात सापडला आहे.
नोट्र-डाम कॅथेड्रल या चर्चला आग लागल्यामुळे राष्ट्राध्यक्षांनी सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. चर्चच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, तिथे आता काहीही शिल्लक नाही. फक्त आता चर्चचा गाभा शाबूत आहेत की नाही त्याचीच चिंता सतावते आहे.

पॅरिसच्या महापौरही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, ही आग भयंकर आहे. तसेच अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत असून, नागरिकांनी आगीच्या जवळपासच्या परिसरात जाऊ नये.
हेलिकॉप्टरमधून पाण्याचा फवारा मारून आगीवर नियंत्रण मिळवा, असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

 

Web Title: The Notre Dame Cathedral In Paris Is On Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.