डॉ. डेनिस मुक्वेगे व नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 03:39 PM2018-10-05T15:39:40+5:302018-10-05T16:59:45+5:30

युद्ध आणि सशस्त्र संघर्षादरम्यान होणाऱा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या डेनिस मुकुवे आणि नादिया मुराद यांना सन 2018 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.

The Nobel Peace Prize for 2018 has been awarded to Denis Mukwege and Nadia Murad | डॉ. डेनिस मुक्वेगे व नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार

डॉ. डेनिस मुक्वेगे व नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार

Next

स्टॉकहोम : युद्ध काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात लढणारे डॉ. डेनिस मुक्वेगे आणि इसिसने केलेले अपहरण व अत्याचार यांचा सामना करून त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर याच कारणांसाठी लढणा-या नादिया मुराद या दोघांना संयुक्तरीत्या यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
युद्ध व संघर्षाच्या काळात होणारे लैंगिक शोषण थाबावे, यासाठी या दोघांनी केलेल्या कार्याबद्दल त्याचा गौरव केला जात आहे. डॉ. डेनिस मुक्वेगे हे कांगोतील असून, नादिया मुराद या इराकमधील याझ्दी कुर्दिश वंशाच्या आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी, त्या १९ वर्षांच्या असताना इसिसच्या अतिरेक्यांनी त्यांच्या गावावर हल्ला चढवून ६00 लोकांना ठार केले होते. त्यात नादिया यांचे नातेवाईकही होते. त्यानंतर अतिरेक्यांनी नादियासह ६५00 महिलांचे अपहरण केले.
नादिया यांच्यासह या गुलाम बनवण्यात आलेल्या महिलांवर बलात्कार, मारहाण, सिगारेटचे चटके देणे आणि अनन्वित अत्याचार करण्यात आले. संधी मिळताच तेथून पळून आलेल्या नादिया यांनी सातत्याने महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविला आणि प्रयत्नही केले. त्या २५ वर्षांच्या आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा संघासमोर त्यांनी महिलांवर युद्ध व सशस्त्र संघर्षाच्या काळात होणा-या अत्याचाराचे चित्र उभे केले आणि त्याविरोधात उभे राहण्याचे आवाहनही केले.


डॉ. डेनिस मुकेग्वे हे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. दुस-या कांगो युद्धापासून आजपर्यंत तिथे होणा-या सामूहिक बलात्कारपीडित महिलांवर ते सातत्याने उपचार करीत आहेत. अशा महिलांच्या जखमा ब-या करण्यासाठी त्यांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. महिलांवरील अत्याचार व बलात्कार यांना आळा घालण्यासाठी कांगो सरकार आणि अनेक देश दुर्लक्ष करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी संयुक्त राष्ट्रांत केले होते. त्यांच्या या कार्याला विरोध करणा-या काहींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता आणि त्यांच्या मुलीचेही अपहरण केले होते. त्यांनी कार्य थांबवावे, अशी अपहरणकर्त्यांची मागणी होती. पण त्याला ते बळी पडले नाहीत.


यांचीही होती नामांकने
यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३१ जणांचे नामांकन होते. त्यात डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचे हुकूमशहाकिम जोंग उन, पोप फ्रान्सिस, दक्षिण कोरियाचे मून जे इन यांचा समावेश होता. तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामांकनासाठी प्रयत्न केले होते.

Web Title: The Nobel Peace Prize for 2018 has been awarded to Denis Mukwege and Nadia Murad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.