नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही.एस. नायपॉल कालवश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 11:08 AM2018-08-12T11:08:32+5:302018-08-13T05:30:37+5:30

नोबेल पुरस्कारविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल यांचे निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. नायपॉल यांच्या कुटुबीयांकडून शनिवारी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली

Nobel laureate V.S. Naipaul Kalesh | नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही.एस. नायपॉल कालवश

नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही.एस. नायपॉल कालवश

Next

लंडन - नोबेल पुरस्कारविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल यांचे निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. नायपॉल यांच्या कुटुबीयांकडून शनिवारी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली. नायपॉल यांच्या कामगिरी महान असून त्यांनी शेवटच्या इच्छेप्रमाणे आपल्या प्रियजनांसमोरच अखेरचा श्वास घेतला, असे नायपॉल यांच्या पत्नीने म्हटले आहे. नायपॉल यांचे जीवनात अनेक आश्चर्यजनक बाबी घडल्या असून ते वळणावळाचे होते, असेही त्यांनी म्हटले.

विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांनी 30 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. सन 2001 साली त्यांना साहित्याचानोबेल पुरस्कार देण्यात आला. विद्याधर यांचा जन्म त्रिनिनाद येथे झाला होता, तर त्यांचे वडिल एक प्रशासकीय अधिकारी होते. 'अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास' ही त्यांच्या साहित्यातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांचे अर्धआत्मचरित्रच आहे. कॅरेबियाई देशांमध्ये आलेल्या भारतीय प्रवाशांचे वर्णन या पुस्तकात आहे. भारतीय प्रवाशांचा कॅरेबियाई देशात मिसळलेला आपलेपणा आणि तेथील संस्कृतीशी झालेला जिव्हाळा, याचे वर्णन या पुस्तकात आहे. 

कोण होते नायपॉल?

-नायपॉल यांचा जन्म त्रिनिनाद येथे १७ आॅगस्ट १९३२ रोजी एका भारतीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील सनदी अधिकारी होते. नायपॉल यांचे आजोबा मजूर म्हणून त्रिनिदाद येथे आले होते.
-आॅक्सफर्ड येथील महाविद्यालयात इंग्रजी विषयात पदवीशिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप मिळाल्यानंतर वयाच्या १८ वर्षी ते इंग्लंडला रवाना झाले व पुढे त्याच देशात स्थायिक झाले.
- नायपॉल हे पॅट्रिशिया अ‍ॅन हॅले हिच्याशी १९५५ साली विवाहबद्ध झाले. तिच्या मृत्यूनंतर त्यांनी १९९६ साली पाकिस्तानी पत्रकार नादिरा खानम अल्वी हिच्याशी दुसरा विवाह केला.

एक महान लेखक हरपला
इतिहास, संस्कृती, वसाहतवाद, राजकारण व अन्य विषयांचे सखोल दर्शन आपल्या साहित्यकृतींतून नायपॉल यांनी घडविले. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वातील एक महान लेखक हरपला आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

वडीलबंधूला गमावले
साहित्य, राजकारण अशा अनेक गोष्टींबद्दल आमचे मतभेद होते, पण त्यांच्या निधनाने वडीलबंधू गमावल्याचे दु:ख मला झाले आहे.
- सलमान रश्दी,
प्रख्यात लेखक

नायपॉल हे मनस्वी लेखक होते. - रामचंद्र गुहा, इतिहासकार

नायपॉल यांना कधीही भेटलो नाही मात्र त्यांच्या पुस्तकांचे अक्षरश: पारायण केले आहे. त्यांच्या लेखनाने केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. - सुकेतु मेहता, लेखक

Web Title: Nobel laureate V.S. Naipaul Kalesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.