नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५५ कोटींची संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 06:18 AM2018-10-26T06:18:05+5:302018-10-26T06:18:24+5:30

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हाँगकाँगमध्ये कारवाई करून २५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

Neerav Modi's assets worth Rs 255 crore in Hong Kong seized | नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५५ कोटींची संपत्ती जप्त

नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५५ कोटींची संपत्ती जप्त

googlenewsNext

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हाँगकाँगमध्ये कारवाई करून २५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
पीएनबीमधील घोटाळ्यात नीरव मोदी याच्यासोबत त्याचा मामा मेहुल चोक्सीही सहभागी होता. या दोघांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत त्यांची सुमारे ४,७४४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. नीरव मोदी याच्याविरुद्ध एक फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने काही मौल्यवान वस्तू २६ जहाजांमध्ये भरून हाँगकाँगला पाठविल्या. दुबईमधील त्याच्याच एका कंपनीने ही वाहतूक केली होती. हा ऐवज आता ईडीने जप्त केला आहे.

Web Title: Neerav Modi's assets worth Rs 255 crore in Hong Kong seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.