मुशर्रफ बरळले! म्हणे, लश्कर-ए- तय्यबा, जमात-ऊद- दावा या संघटना देशभक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:00 AM2017-12-18T01:00:29+5:302017-12-18T01:01:19+5:30

‘लश्कर- ए- तय्यबा’ आणि ‘जमात- ऊद- दावा’ या अतिरेकी संघटनांना पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेझ मुशर्रफ यांनी ‘देशभक्त’ म्हटले. देशाची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी मी या गटांशी आघाडी करायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या मुशर्रफ हे दुबईत स्वत:हूनच विजनवासात गेले आहेत.

 Musharraf got angry! It is said, Lashkar-e-Toiba, Jamat-ud-Dawa or the organization of patriots | मुशर्रफ बरळले! म्हणे, लश्कर-ए- तय्यबा, जमात-ऊद- दावा या संघटना देशभक्त

मुशर्रफ बरळले! म्हणे, लश्कर-ए- तय्यबा, जमात-ऊद- दावा या संघटना देशभक्त

googlenewsNext

इस्लामाबाद : ‘लश्कर- ए- तय्यबा’ आणि ‘जमात- ऊद- दावा’ या अतिरेकी संघटनांना पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेझ मुशर्रफ यांनी ‘देशभक्त’ म्हटले. देशाची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी मी या गटांशी आघाडी करायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या मुशर्रफ हे दुबईत स्वत:हूनच विजनवासात गेले आहेत.
लश्कर- ए- तय्यबाचा आणि तिचा संस्थापक हाफीज सईद यांचा मी फार मोठा पाठीराखा आहे, असे मुशर्रफ गेल्या महिन्यात म्हणाले होते. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद असून सध्या बंदी असलेल्या जमात-ऊद-दावाचा तो प्रमुख आहे. जमात- उद- दावा आणि लश्कर- ए- तय्यबा हे देशभक्त लोक आहेत. त्यांनी पाकिस्तानसाठी व काश्मीरसाठी आपल्या जिवाचे बलिदान दिले आहे, असे मुशर्रफ म्हणाल्याचे एआरवाय वृत्त वाहिनीने म्हटले. या दोन्ही गटांना मोठ्या प्रमाणावर लोकांचा व चांगल्या लोकांचा पाठिंबा आहे आणि जर त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली तर कोणी त्याला आक्षेप घेऊ शकणार नाही. २००८ मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर लश्कर- ए- तय्यबावर बंदी घातली गेली तर जून २०१४ मध्ये अमेरिकेने जमात ऊद दावाला विदेशी अतिरेकी संघटना जाहीर केले.

Web Title:  Musharraf got angry! It is said, Lashkar-e-Toiba, Jamat-ud-Dawa or the organization of patriots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.