The murder of British Prime Minister Theresa May, two people were arrested | ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट, दोन जणांना अटक

लंडन: ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळण्यात मेट्रोपॉलिटन पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.  नायमूर जकारिया रहमान (20) याला उत्तर लंडनमधून आणि  मोहम्‍मद अकीब इमरान (21)याला दक्षिण-पूर्व बर्मिंघम येथून पोलिसांनी अटक केली आहे. 

स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, थेरेसा मे यांना मारण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. डाउनिंग स्‍ट्रीट येथे इम्‍प्रोवाइज्‍ड एक्‍सप्‍लोसिव डिवाइस (IED) चा वापर करून स्फोट घडवून पंतप्रधान थेरेसा मे यांची हत्या करण्याचा कट होता. पण पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला. दोन्ही आरोपींना बुधवारी वेस्‍टमिंस्‍टर मेजिस्‍ट्रेट कोर्टात हजर केलं जाणार आहे. 

या दोघांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलं असून दहशतवादी कारवाया करण्याचे षडयंत्र रचण्याचा दोघांवर आरोप ठेवण्यात आला आहे, अशी माहिती मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिली.  28 नोव्हेंबर रोजी या दोघांना अटक करण्यात आली होती अशी माहिती आहे. 
 
 

English summary:
According to the report by The Guardian, British intelligence agency arrested two men who plotted to kill Prime Minister Theresa May after bombing their way into her official residence. Accused were taken into custody last week, but news of the arrests came when an official report was released.


Web Title: The murder of British Prime Minister Theresa May, two people were arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.