पेइचिंग, दि. 13 - माणुसकीला लाजवेल अशी घटना चीनमध्ये उघडकीस आली आहे.  येथे एका महिलेने माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य केलं आहे.  चीनच्या फुजान प्रांतातली एक महिला आपल्या काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या नवजात बाळाला चक्क एका प्लास्टिक पिशवीत पॅक करून अनाथाश्रमात कुरिअर करायला निघाली होती. मात्र, डिलिव्हरी बॉय पिशवी घेऊन जात असताना त्याला पिशवीतून लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि त्याने पिशवीत पाहिलं तर त्याला नवजात बाळ दिसलं.  

महिलेकडून पॅकेट घेताना कुरिअर बॉयला ते एकदा तपासून पाहायचं होतं पण महिलेने त्यास नकार दिला, अखेर  पॅकेट घेऊन कुरिअर बॉय अनाथाश्रमात जात असताना रस्त्यात त्याला पॅकेटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि त्याने पिशवीत पाहिलं तर त्याला नवजात बाळ दिसलं.  त्याने तत्काळ पोलिसांना घटनाबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सिचुआन प्रांतातून 24 वर्षीय बाळाच्या आईला ताब्यात घेतलं. 


या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या क्रूर आईच्या अशा वागण्यावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर, अशा क्रूर आईकडे मुलीला पुन्हा देण्याऐवजी अनाथाश्रमातच पाठवण्याची मागणी सोशल मीडियातून जोर धरत आहे.