ट्रम्पसह अनेक नेत्यांशी मोदींच्या शुभेच्छा भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 03:58 AM2017-11-13T03:58:38+5:302017-11-13T03:59:58+5:30

’एशियान’ संघटनेच्या ५0 व्या वर्षानिमित्त आयोजित मेजवानीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांची अल्पकाळ उभ्याउभ्या भेट घेऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली.

Modi's greetings to many leaders including Trump | ट्रम्पसह अनेक नेत्यांशी मोदींच्या शुभेच्छा भेटी

ट्रम्पसह अनेक नेत्यांशी मोदींच्या शुभेच्छा भेटी

Next
ठळक मुद्देएशियान’ संघटनेच्या ५0 व्या वर्षानिमित्त आयोजित मेजवानीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली

लोकमत न्यूज नेटवर्क
मनिला : ’एशियान’ संघटनेच्या ५0 व्या वर्षानिमित्त आयोजित मेजवानीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांची अल्पकाळ उभ्याउभ्या भेट घेऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली. मोदी व ट्रम्प यांची औपचारिक बैठक उद्या सोमवारी दुपरी व्हायची आहे.
‘एशियान’ शिखर परिषद व अनुषंगिक बैठकांसाठी आलेल्या सदस्य देशांच्या नेत्यांसाठी फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रोनल्डो द्दय़ुतेर्ते यांनी स्वागत समारंभ आयोजित केला होता. सर्व पाहुण्या नेत्यांनी फिलिपीन्सचा राष्ट्रीय पेहराव असलेला, फिकट पिवळ्य़ा रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला ‘बाराँग तगलाँग’ हा शर्ट परिधान केला होता. या वेळी जमलेल्या नेत्यांच्या मांदियाळीत फेरपटका मारून मोदी यांनी शिन्जो अबे (जपान), दिमित्री मेदवेदेव (रशिया) व नजिब रझाक (मलेशिया) या पंतप्रधानांशीही गप्पागोष्टी केल्या.

Web Title: Modi's greetings to many leaders including Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.