उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:47 AM2017-11-30T01:47:52+5:302017-11-30T01:48:21+5:30

अवघी अमेरिका आमच्या निशाण्यावर आली असून, आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या (बॅलिस्टिक मिसाइल) यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरिया आता पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले आहे, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी केली.

 A. In the missile phase of Korea, America claims to be a nuclear weapon | उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा

उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा

Next

सेऊल : अवघी अमेरिका आमच्या निशाण्यावर आली असून, आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या (बॅलिस्टिक मिसाइल) यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरिया आता पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले आहे, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी केली.
‘वा-साँग-१५’ या नवीन क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाचे हे धाडस हा जगाच्या दृष्टीने धोकादायक असल्याच्या प्रतिक्रिया जगभरातून उमटल्या आहेत. ४,४७४ किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर हे क्षेपणास्त्र चाचणी स्थळापासून ९५० कि.मी. जपानजवळ समुद्रात पडले.
अमेरिकेत कोठेही हल्ला करण्यास सक्षम अशा क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे उत्तर कोरियाचे पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्टÑ बनण्याचे स्वप्न साकार झाले आहे, असे उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांनी मोठ्या गर्वाने म्हटले आहे.
या चाचणीवर अमेरिका, रशिया, चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि संयुक्त राष्टÑानेही चिंता व्यक्त केली. संयुक्त राष्टÑाची सुरक्षा परिषद या मुद्यावर सुरक्षा तातडीने अधिवेशन बोलविण्यास सहमत झाले आहे. ट्रम्प यांनी जपनाचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-जे-इन यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
आम्ही यावर मात करू एवढेच सांगतो, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. उत्तर कोरियाची ही ताजी कृती सरासर हिंसक कृती आहे. ही कृती कोणत्याही स्थितीत खपवून घेतली जाणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांनी दिली.

Web Title:  A. In the missile phase of Korea, America claims to be a nuclear weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.