लॉटरी जॅकपॉट्स पोहोचले ८५८ दशलक्ष डॉलर्सवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 01:48 AM2018-01-04T01:48:33+5:302018-01-04T01:48:59+5:30

पॉवरबॉल जॅकपॉट व मेगा मिलियन्स जॅकपॉट ८५८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले असून लॉटरीच्या इतिहासात दोन्ही लॉटरीचे जॅकपॉट एकाचवेळी ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वर उसळण्याची ही दुसरी घटना आहे.

Lottery jackpots reached 858 million dollars! | लॉटरी जॅकपॉट्स पोहोचले ८५८ दशलक्ष डॉलर्सवर!

लॉटरी जॅकपॉट्स पोहोचले ८५८ दशलक्ष डॉलर्सवर!

Next

वाशिंग्टन - पॉवरबॉल जॅकपॉट व मेगा मिलियन्स जॅकपॉट ८५८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले असून लॉटरीच्या इतिहासात दोन्ही लॉटरीचे जॅकपॉट एकाचवेळी ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वर उसळण्याची ही दुसरी घटना आहे.
भारतीय वेळेनुसार बुधवारी मेगा मिलियन्सची लॉटरी लागलेल्यांनी टिकीट सादर न केल्याने आता ही लॉटरी ४१८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली असून, शुक्रवारी रात्री ड्रा काढण्यात येणार आहे. पॉवरबॉल लॉटरीचा जॅकपॉटही असाच उसळून ४४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. पॉवरबॉलचा सर्वोच्च रेकॉर्ड १.५८६ अब्ज अमेरिकन डॉलर्स जानेवारी २०१६ मधील आहे. तर मेगा मिलीयन्सचा सर्वोच्च जॅकपॉट ६५६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा मार्च २०१२ मधील आहे.

Web Title: Lottery jackpots reached 858 million dollars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :USअमेरिका