Lion Air flight Crash : 188 प्रवाशांना घेऊन जाणारं लायन एअरवेजचं विमान समुद्रात कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 07:57 AM2018-10-29T07:57:40+5:302018-10-29T12:05:58+5:30

Lion Air flight : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये सोमवारी (29 ऑक्टोबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली.  जकार्ताहून उड्डाण भरलेले लायन एअरवेजचं विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे.

Lion Air flight from Jakarta to Pangkal Pinang goes missing 13 minutes after take-off | Lion Air flight Crash : 188 प्रवाशांना घेऊन जाणारं लायन एअरवेजचं विमान समुद्रात कोसळलं

Lion Air flight Crash : 188 प्रवाशांना घेऊन जाणारं लायन एअरवेजचं विमान समुद्रात कोसळलं

googlenewsNext

जकार्ता - इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये सोमवारी (29 ऑक्टोबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली. लायन एअरवेजचं जकार्ताहून उड्डाण केलेलं विमान कोसळलं आहे. लायन एअरवेजचं जेटी 610 हे प्रवासी विमान समुद्रात कोसळले आहे. उड्डाणाच्या 13 मिनिटांनंतर हे विमान कोसळले. जकार्ताहून पान्गकल पिनांगकडे हे विमान प्रवास करत होते. विमानानं उड्डाण केल्यानंतर सकाळी 6.33 वाजण्याच्या सुमारास विमानाचा संपर्क तुटला. यानंतर थेट विमान कोसळल्याचीच माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर इंडोनेशिया प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली. 

दरम्यान, विमानात क्रू मेम्बर्ससहीत 188 प्रवासी होते.   



 



 



 





 





 

Web Title: Lion Air flight from Jakarta to Pangkal Pinang goes missing 13 minutes after take-off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.