Lion Air flight : विमान फक्त दोन महिनेच जुने आणि भारतीय पायलट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:33 PM2018-10-29T12:33:14+5:302018-10-29T12:34:48+5:30

इंडोनेशियाच्या जकार्ताहून पांकल पिनांग शहराकडे जात असलेले लायन एअरचे विमान आज समुद्रात कोसळले. दुर्घटनेनंतर मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Lion Air flight: The aircraft is just two months old and Indian pilot | Lion Air flight : विमान फक्त दोन महिनेच जुने आणि भारतीय पायलट

Lion Air flight : विमान फक्त दोन महिनेच जुने आणि भारतीय पायलट

googlenewsNext

जकार्ता : इंडोनेशियाच्या जकार्ताहून पांकल पिनांग शहराकडे जात असलेले लायन एअरचे विमान आज समुद्रात कोसळले. या विमानातून 189 जण प्रवास करत होते. यामध्ये 181 प्रवासी, दोन पायलट आणि सहा विमान कंपनीचे कर्मचारी होते. दुर्घटनेनंतर मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

विमानाने सोमवारी सकाळी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पायलटने माघारी परतण्याची विनंती केली होती. मात्र, परवानगी मिळाल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानामध्ये इंडोनेशियाचे अर्थखात्याचे 20 अधिकारीही प्रवास करत होते. तसेच विमानातील दोन पायलटपैकी एक पायलट भारतीय होता. कॅप्टन भव्य सुनेजा असे या पायलटचे नाव होते. ते दिल्लीचे रहिवासी आहेत. मार्च 2011 मध्ये त्यांनी लायन एअरमध्ये नोकरी स्वीकारली होती. विमानाचा संपर्क तुटल्याच्या ठिकाणापासून 3.7 किमी दूरवर कारावांग खाडीमध्ये विमान कोसळले. 


विमानाचा मलबा सापडला असून नौदलाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे. ही विमान दुर्घटना इंडोनेशियाची आजवरची सर्वात मोठी आहे. याआधी 2014 मध्ये  एयर एशियाचे विमान क्यूझेड 8501 दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामद्ये 162 लोकांचा मृत्यू झाला होता. हे विमान बोइंग 737 मैक्स-8  होते. 

संपर्क तुटण्याआधी 5 हजार फुटांच्या उंचीवर
फ्लाईटरडारच्या माहितीनुसार लायनचे जेटी-610 या विमानाने सकाळी 6.20 वाजता उड्डाण केले. यानंतर 13 मिनिटांनी समुद्रावर हे  विमान गायब झाले. तेव्हा हे विमान 5 हजार फुटांच्या उंचीवर होते. मात्र, काही वेळातच हे विमान खाली येऊ लागले. संपर्क तुटला तेव्हा हे विमान 3650 फुटांच्या उंचीवर होते. 

दोन महिन्य़ांपूर्वीच विमानाची खरेदी
बोईंग कंपनीच्या या 737 मॅक्स-8 विमानाचा हा पहिलाच अपघात होता. 2016 पर्यंत हे मॉडेल केवळ व्यावसायिक वापरासाठीच होते. मात्र, यंदाच्या ऑगस्टमध्ये हे नवे विमान लायन एअरला विकण्यात आले. विमान उडविणारे पायलटही अनुभवी होते. दोघांनाही एकूण 11 हजार तास विमानउड्डाणाचा अनुभव होता. 
 

Web Title: Lion Air flight: The aircraft is just two months old and Indian pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.