अमेरिकेतील बँकेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 11:12 AM2019-01-24T11:12:58+5:302019-01-24T11:23:48+5:30

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका बँकेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

At least 5 shot dead in hostage situation in at Florida bank | अमेरिकेतील बँकेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

अमेरिकेतील बँकेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देअमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका बँकेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. झीफेन एव्हर असे संशयित हल्लेखोराचे नाव असून पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. 

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका बँकेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. झीफेन एव्हर असे संशयित हल्लेखोराचे नाव असून पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झीफेन एव्हर हा 21 वर्षीय तरुण आहे. झीफेन सीब्रिंग येथील सन ट्रस्ट बँकेच्या आतमध्ये आला आणि त्यानंतर त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने स्वत: हून पोलिसांना फोन केला आणि बँकेमध्ये गोळीबार केल्याची माहिती दिली. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराने हा गोळीबार का केला यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 2017 मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत जवळपास 40,000 लोकांचा मृत्यू झाला होता. 



 

Web Title: At least 5 shot dead in hostage situation in at Florida bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.