सोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 05:46 AM2018-02-24T05:46:30+5:302018-02-24T08:03:34+5:30

या शक्तीशाली बॉम्बस्फोटात 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

At least 18 people killed in car bomb attacks in Somalia's capital Mogadishu | सोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी 

सोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी 

googlenewsNext

मोगादिशू - सोमालियाची राजधानी मोगादिशू शुक्रवारी सर्वात शक्तीशाली स्फोटाने हादरली.  या शक्तीशाली बॉम्बस्फोटात 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. दहशतवादी संघटना अल-शबाब जिहादीनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

राष्ट्रपती भवनाजवळ आणि एका हॉटेलसमोर दोन कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला असल्याची माहिती मोगादिशू शहराच्या रुग्णवाहिका सेवेतील आधिकाऱ्यानं दिली. मिळालेल्या माहितीनुसार जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  


या भिषण बॉम्बस्फोटाच्या एकदिवस आधी सोमालिया सरकारनं दहशतवादी हल्ल्याची पुर्वसुचना दिली होती. या हल्ल्यानंतर एक महिन्यापासून मोगादिशूमध्ये असलेली शांतता आता भंग झाली आहे.  दोन महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा कार बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर तीन महिन्यापूर्वी शक्तीशाली स्फोट घडवून आणला होता. ज्यात 350हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्येच स्फोट घडवून आणला होता. एका हॉटेल आणि बाजाराच्या बाहेर झालेल्या स्फोटात 350 लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 लोक जखमी होते. गेल्या तीन दशकातील हा सर्वात शक्तीशाली स्फोट होता. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून 100 ते 150 मीटरच्या परिघात उपस्थित असलेले नागरिकही मृत्युमुखी पडले होते.
 

Web Title: At least 18 people killed in car bomb attacks in Somalia's capital Mogadishu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.