कितना अच्छा है मोदी! ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घेतली मोदींसोबत सेल्फी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 10:11 AM2019-06-29T10:11:00+5:302019-06-29T10:11:26+5:30

कितना अच्छा है मोदी! याचसोबत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतलेला सेल्फी फोटो अपलोड केला आहे. 

'Kithana ache he Modi': Australian PM celebrates friendship with Modi | कितना अच्छा है मोदी! ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घेतली मोदींसोबत सेल्फी 

कितना अच्छा है मोदी! ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घेतली मोदींसोबत सेल्फी 

Next

ओसाका - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भारतात किती आहे हे सांगण्याची गरज नाही. मात्र जगातील अन्य देशातील नेत्यांनाही मोदींच्या लोकप्रियतेचं कौतुक वाटतं. जपानमध्ये सध्या जी 20 देशाची शिखर परिषद सुरु आहे. आज या शिखर परिषदेचा शेवटचा दिवस आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांच्यासोबत सेल्फी काढला. 

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्यांच्या ट्विटर हॅँडलवरुन एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिलं आहे की, कितना अच्छा है मोदी! याचसोबत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतलेला सेल्फी फोटो अपलोड केला आहे.  आज जी 20 परिषदेत पर्यावरणासारख्या गंभीर मुद्द्यावर जगातील नेत्यांची चर्चा होणार आहे. या बैठकीत पुढील 2050 पर्यंत जगातील समुद्रात असणारा प्लास्टिक कचरा संपुष्टात आणण्यासाठी एकमत होणार असल्याची शक्यता आहे. 


शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचं अभिनंदन केलं. तर मोदींनी या भेटीत चार मुद्द्यांचा उल्लेख केला. यानंतर या दोन्ही नेत्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी चर्चा केली. 

Image result for G 20 modi

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. 'सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही या विजयास पात्र आहात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडणूक जिंकलात, तेव्हा अनेक गट आपापसात लढत होते. मात्र आता ते एकत्र आले आहेत. यातून तुमची अद्भुत क्षमता दिसते,' अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं. ट्रम्प यांनी केलेल्या कौतुकाबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि अमेरिकेत इराण, 5जी, संरक्षण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दल चर्चा होईल, असं मोदींनी म्हटलं. 

Related image

भारत लोकशाही आणि शांततेसाठी कटिबद्ध असल्याचं मोदी म्हणाले. 'सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत,' असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं. तर गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारल्याचं ट्रम्प म्हणाले. भारत आणि अमेरिकेची मैत्री नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून मोदी माझे चांगले मित्र असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं.

Web Title: 'Kithana ache he Modi': Australian PM celebrates friendship with Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.