1953 नंतर प्रथमच उत्तर कोरियन नेता जाणार दक्षिण कोरियामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 12:15 PM2018-04-26T12:15:43+5:302018-04-26T12:18:24+5:30

चर्चेचे पहिले सत्र झाल्यावर उत्तर कोरियाचे शिष्टमंडळ जेवणासाठी परत आपल्या देशात जातील आणि नंतर पुन्हा चर्चेसाठी येतील.

Kim Jong-un to meet Moon Jae-in at Korean border for summit | 1953 नंतर प्रथमच उत्तर कोरियन नेता जाणार दक्षिण कोरियामध्ये

1953 नंतर प्रथमच उत्तर कोरियन नेता जाणार दक्षिण कोरियामध्ये

सेऊल- उद्याचा शुक्रवार आशिया आणि पर्यायाने जागतिक शांततेच्या दिशेने नवे पाऊल टाकण्यासाठी महत्त्वाचा छरणार आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची अणूकार्यक्रमासह इतर अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. 1953 नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उ.कोरियन नेते असतील.

नव्याने जाहीर झालेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम यांची सकाळी स्थानिकवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता (भारतीय वेळेनुसार 6 वाजता) भेट होणार आहे. उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांचा भविष्यात त्याग करू शकेल का या संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या विषयावर यामध्ये चर्चा होऊ शकते. तसेच या दोन्ही शेजारी देशांमधील तणाव निवळण्यासाठीही या परिषदेचा उपयोग होऊ शकतो.
यापुर्वी 2000 आणि 2007 साली अशाच प्रकारची परिषद झाली होती. या बैठकीमुळे किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या चर्चेसाठीही आशादायक प्रगती होणार आहे.

कशी असेल ही ऐतिहासिक परिषद-
किम आणि त्यांच्या नऊ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची दोन्ही देशांच्या सीमेजवळ मून जाए-इन भेट घेतील. त्यानंतर साऊथ कोरियन रक्षकदल दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या लष्करमुक्त प्रदेशामध्ये असणाऱ्या पॅन्मुन्जोम येथे दोन्ही नेत्यांना घेऊन जाईल. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता चर्चेला सुरुवात होईल. ही चर्चा पॅन्मुन्जोम येथे पीस हाऊस या इमारतीत होणार आहे. पहिल्या सत्रानंतर भोजनासाठी उत्तर कोरियन शिष्टमंडळ व किम पुन्हा आपल्या देशात जातील. जेवणानंतर ते पुन्हा चर्चेसाठी सीमा ओलांडून द. कोरियात येतील. दुपारच्या सत्रात दोन्ही देशांची माती आणि पाणी वापरुन एका पाईनच्या रोपाचे रोपण दोन्ही नेते करतील. शांतता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून या दोन्ही देशांमधील माती व पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेसाठी किम जोंग उन यांच्या शिष्टमंडळात त्यांची बहिण किम यो-जोंगचाही समावेश आहे. किम योंग-नाम हे उत्तर कोरियाचे नामधारी प्रमुख आहेत तेसुद्धा या चर्चेत सहभागी होतील.

Web Title: Kim Jong-un to meet Moon Jae-in at Korean border for summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.