नेपाळचे गुरखे करणार डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 01:30 PM2018-06-05T13:30:43+5:302018-06-05T13:30:43+5:30

गुरखा ही नेपाळमधील एक लढवय्या जमात म्हणून प्रसिद्ध आहे.

With khukris and assault rifles, Singapore's Gurkhas to guard Trump-Kim summit | नेपाळचे गुरखे करणार डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांचे संरक्षण

नेपाळचे गुरखे करणार डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांचे संरक्षण

सिंगापूर- सिंगापूर येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची भेट होणार आहे. गेल्या वर्षभराच्या तणावानंतर होत असलेल्या या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या महिन्यामध्ये किम जोंग उन यांची दक्षिण कोरियाचे पंतप्रधान मून जाए इन यांची भेट झाली. त्यावेळेस अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याहून ही अधिक महत्त्वाची भेट असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही तितकीच कडक असणार आहे. या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी नेपाळच्या गुरख्यांकडे देण्यात आलेली आहे.

हे दोन्ही नेते त्यांचे संरक्षण करणारे स्वतःचे समूह घेऊनच सिंगापूरमध्ये येणार आहेत. तसेच सिंगापूर पोलीस, गुरखा सुरक्षारक्षकांचे दल शिखर परिषदेच्या जागेचे रक्षण करेल. रस्ते, हॉटेल्स आणि मुत्सद्दी, राजनयीक अधिकारी या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारीही गुरख्यांकडे आहे.

सिंगापूरमध्ये गुरख्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे संरक्षण सचिव जीम मॅटिस यांनी सिंगापूरला भेट दिली तेव्हाही सुरक्षेची जबाबदारी गुरख्यांकडे देण्यात आली होती. 

नेपाळच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या या गुरख्यांना सिंगापूर पोलिसांनी भरती करुन घेतले आहे. सुरक्षा जॅकेट्स, बेल्जीयन बनावटीचे स्कार कॉम्बॅट अझॉल्ट रायफल, पिस्तुले असे ते सुसज्ज असतील. सिंगापूर पोलिसांमध्ये 1800 गुरखा असतील असावेत असा अंदाज आहे. नेपाळमधील गुरख्यांची एक लढवय्या जमात म्हणून ओळख आहे. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना सैन्यदलांमध्ये भरती करुन घेतले होते. त्यामुळे भारत, नेपाळ, सिंगापूर, इंग्लंड, ब्रुनेई या देशांच्या लष्करामध्ये सेवा बजावत आहेत. त्यांनी दोन्ही महायुद्धांमध्ये तसेच फॉकलंड बेटांसाठीच्या लढाईत व नुकत्याच अफगाणिस्तान कारवाईतही सहभाग घेतला होता.

Web Title: With khukris and assault rifles, Singapore's Gurkhas to guard Trump-Kim summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.