जय हो... जपानमध्ये निवडणूक जिंकत मराठमोळ्या पुणेकराने इतिहास रचला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 11:15 AM2019-04-24T11:15:11+5:302019-04-24T11:16:14+5:30

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील योगेंद्र पुराणिक यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 1997 साली योगी शिक्षणा निमित्त जपानला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात

Jay ... ... Marathmole Pune has created history by winning the election in Japan yogesh puranik in tokiyo | जय हो... जपानमध्ये निवडणूक जिंकत मराठमोळ्या पुणेकराने इतिहास रचला

जय हो... जपानमध्ये निवडणूक जिंकत मराठमोळ्या पुणेकराने इतिहास रचला

googlenewsNext

मुंबई - भारतीय वंशाचे 41 वर्षीय योगेंद्र उर्फ योगी जपानमधीलनिवडणूक जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. योगेंद्र यांनी जपानची राजधानी टोकियोमधील ‘इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशन’च्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला होता. त्यासाठी 21 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये योगेंद्र यांना 6477 मते मिळाली. विशेष म्हणजे योगेंद्र हे मराठी माणूस असून ते मूळ पुण्याचे रहिवासी आहेत.  

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील योगेंद्र पुराणिक यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 1997 साली योगी शिक्षणा निमित्त जपानला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बरीच वर्षे जपानमध्ये काम केले. त्यांनी Mizuho बँकेत शेवटची नोकरी केली. योगेंद्र सध्या माजी बँक कर्मचारी असून नुकतेच त्यांनी जपानमधील इडोगाव मतसंघातून निवडणूक लढवली. या विभागात जवळजवळ 4 हजार 500 भारतीय स्थायिक आहेत. जपामध्ये राहणाऱ्या सर्वाधिक भारतीयांची संख्या जवळपास 10 टक्के येथेच आहे. त्यामुळेच योगींना येथून विजय मिळवता आला. त्यांना मिळालेली मते ही तेथील 2,26,561 मतांमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक मते ठरली आहेत. 

गेल्या 10 वर्षांपासून योगी ‘कॉन्सीट्यूएंट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपान’ (CDP) या पक्षामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यातूनच अनेकांची मने जिंकली आहेत. या जाहिरनाम्यामध्ये योगेंद्र यांनी व्यावसायिक शिक्षण आणि प्रत्येक मुलाला सरकारी शाळेत शिक्षण मिळावे, अशा अनेक मुद्दांचा समावेश केला आहे. हे मुद्दे जपानमधील नागरिकांसाठी फार महत्वाचे असल्याचे योगेंद्र यांनी सांगितले. जपानमध्ये 2011 साली आलेल्या भूकंपानंतर मी केवळ जपानच्या नागरिकतेपूरतेच मर्यादीत न राहता येथील राजकीय विश्वाचा भाग बनविण्याचे निश्चित केल्याचं पुराणिक यांनी म्हटलं आहे.  
 

Web Title: Jay ... ... Marathmole Pune has created history by winning the election in Japan yogesh puranik in tokiyo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.