जपानी लोकांचा अजब-गजब ‘शुकात्सु’ उत्सव, शुकात्सु म्हणजे मृत्यूची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 04:42 AM2017-09-23T04:42:02+5:302017-09-23T04:45:27+5:30

सण, वार आणि उत्सव यांची तयारी तर सर्व जण करतात. पण, या जपानी लोकांच्या ‘शुकात्सु’ उत्सवाबाबत ऐकून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

Japanese Shukatsu festival, Shukatsu means death gate | जपानी लोकांचा अजब-गजब ‘शुकात्सु’ उत्सव, शुकात्सु म्हणजे मृत्यूची तयारी

जपानी लोकांचा अजब-गजब ‘शुकात्सु’ उत्सव, शुकात्सु म्हणजे मृत्यूची तयारी

googlenewsNext


सण, वार आणि उत्सव यांची तयारी तर सर्व जण करतात. पण, या जपानी लोकांच्या ‘शुकात्सु’ उत्सवाबाबत ऐकून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. राजधानी टोकियोत हा उत्सव साजरा करण्यात येतो. शुकात्सुचा अर्थ आहे मृत्यूसाठी तयार राहणे. यानिमित्त लोक एकत्र येतात आणि आपल्या मृत्यूची तयारी करतात. म्हणजे अगदी कपड्यांपासून ते शवपेटीपर्यंतची निवड करून ठेवतात. मृत्यूचे नाव उच्चारले तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण, जीवनातील हे सत्य तेवढ्याच सहजतेने स्वीकारणा-या या लोकांचे कौतुकच करायला हवे. तिथे चक्क शुकात्सु फेस्टिव्हलही होतो.

Web Title: Japanese Shukatsu festival, Shukatsu means death gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.