जानेवारी महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू येणार भारतभेटीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 10:16 PM2017-11-15T22:16:16+5:302017-11-15T22:16:33+5:30

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू २०१८ साली जानेवारी महिन्यात भारतात येत आहेत.

Israeli Prime Minister Benjamin Netanyahu arrives in India in January | जानेवारी महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू येणार भारतभेटीवर

जानेवारी महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू येणार भारतभेटीवर

Next

जेरुसलेम-  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू २०१८ साली जानेवारी महिन्यात भारतात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी इस्रायचा एेतिहासिक दौरा केल्यानंतर भारत आणि इस्रायल यांनी द्वीपक्षीय संबंधांमध्ये नवे पाऊल टाकले आहे. इस्रायलभेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यानाहू यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते, त्याचा स्वीकार नेत्यानाहू यांनी केला होता. 

भारताला भेट देणारे नेत्यानाहू हे दुसरे इस्रायली पंतप्रधान ठरतील. यापुर्वी २००३ साली अरायल शेराँन यांनी भारताला भेट दिली होती. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर तेव्हा चर्चा केली होती. इस्रायल आणि भारत यांच्या संबंधांना तेव्हापासून गती मिळाली होती. यावर्षी भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये राजनयीक संबंध प्रस्थापित होण्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. 

भारत-इस्रायल यांच्या संबंधांवर दृष्टीक्षेप
१९९२ - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित
१९९७- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट
२०००- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट
२००३- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट
२००६- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची  इस्रायल भेट
२०१२- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट
२०१४- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट. 
२०१४- टवीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद
२०१४- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट
२०१५- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)
२०१५- भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती

२०१६- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा इस्रायल दौरा

२०१७- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा इस्रायल दौरा, जगभरात चर्चा, विविध करारांवर स्वाक्षर्या
        व्यापारी संबंध
भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे

Web Title: Israeli Prime Minister Benjamin Netanyahu arrives in India in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.