ठळक मुद्देपाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय'चे प्रमुख लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार यांनी दहशतवाद्यांची भेट घेतलीया भेटीत रासायनिक युद्धासंबंधी चर्चा करण्यात आलीनवीद मुख्तार यांनी ज्यांची भेट घेतली, त्यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीनचे दहशतवादी सामील होते

इस्लामाबाद -  पाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय'चे प्रमुख लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार आणि पाकिस्तानी लष्कराच्या काही प्रतिनिधींनी गेल्या महिन्यात दहशतवाद्यांची भेट घेत रासायनिक युद्धासंबंधी चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. टाइम्स नाऊने यासंबंधी वृत्त दिलं आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील बाग जिल्ह्यात ही भेट झाली होती. नवीद मुख्तार यांनी ज्यांची भेट घेतली, त्यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीनचे दहशतवादी सामील होते. 

या बैठकीत नवीद मुख्तार यांच्याशिवाय आयएसआयचे अन्य तीन अधिकारी ब्रिगेडियर हाफिज अहमद, लेफ्टनंट कर्नल जावेद अहमद और मेजर जफर अली उपस्थित होते. पाकिस्तानी लष्कराच्या बाजूने कॅप्टन मन्सूर अली सहभागी झाले होते. हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जुड्डा खान आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशवादी जावेद अख्तर या बैठकीला हजर होते अशी माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआय प्रमुख नवीद मुख्तार यांनी दहशतवाद्यांना थंडी वाढण्याआधीच जम्मू काश्मीरमध्ये आपली स्थिती मजबूत करण्यास सांगितलं असून, त्यासाठी लागणारी आर्थिक मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. बर्फवृष्टी सुरु झाल्यानंतर काश्मीरमध्ये घुसखोरी करणं कठीण होऊन जातं. 

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, 'आयएसआय प्रमखांनी दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवण्याची जबाबदारी पाकिस्तानी लष्कराच्या अधिका-यावर सोपवली आहे. दहशतवाद्यांना थंडी वाढण्याआधी आणि बर्फवृष्टी सुरु होण्याआधीच भारतात घुसखोरी करण्याचा आदेश दिला गेला आहे'. रिपोर्टनुसार, आयएसआय प्रमुखांनी काश्मीर खो-यात शांत बसलेल्या दहशतवाद्यांना पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा आदेशही दिला आहे. 

रिपोर्टमध्ये सांगण्यात आल्यानुसार, आयएसआय प्रमुखांनी रासायनिक युद्धासाटी चीनमधील प्रशिक्षित पाकिस्तानी अधिका-यांनी भारत - पाकिस्तान नियंत्रण रेषेवर तैनात करण्याच्या शक्यतेवरही विचार केला. पाकिस्तानी लष्कराचे 20 अधिकारी चीनमध्ये रासायनिक युद्धाचं ट्रेनिंग घेत असल्याचा दावाही गुप्त अहवालात करण्यात आला आहे. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.