'Invisible nuclear missile to Russia' | ‘रशियाकडे अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र’
‘रशियाकडे अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र’

मॉस्को : रशियाने अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र बनवले आहे. हे क्षेपणास्त्र वेगवान असेल व शत्रूला समजण्याआधीच ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले असेल, असा खळबळजनक खुलासा रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दमीर पुतीन यांनी केला आहे. पुतीन यांनी वार्षिक कार्यक्रमात ही माहिती दिली. रशियन नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रबळ होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.
ते म्हणाले, अमेरिकी लष्कराला मात देण्याची ताकद रशियाच्या जवानांमध्ये आहे. रशियाचे तरुण हे अत्याधुनिक तंत्रात अग्रेसर आहेत. या तरुणांनी तयार केलेले नवीन क्षेपणास्त्र वेगवान आहे. शत्रूला चोख उत्तर देणारे आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण झाली आहे. आता आपण अधिक अत्याधुनिक शस्त्र बनविणार आहोत.
भाषण करताना त्यांनी एक सादरीकरणही केले. त्यात त्यांनी या क्षेपणास्त्राचा मार्ग व दिशा दाखवली. दक्षिण अटलांटिक महासागरातून पुढे सरकारणारे हे क्षेपणास्त्र अमेरिकेवर घोंघावते याचे प्रात्यक्षिक यात होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम हे बहुतांश वेळा वास्तव्य करत असलेल्या मार-ए-लागो रिसॉर्टच्या केंद्राचा तपशीलही या सादरीकरणात दाखविण्यात आला.


Web Title: 'Invisible nuclear missile to Russia'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.