ख्राईस्टचर्च येथील मशिदीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी घडवले साखळी बॉम्बस्फोट, श्रीलंकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 02:57 PM2019-04-23T14:57:51+5:302019-04-23T15:15:07+5:30

रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Initial probe shows Sri Lanka attacks were 'retaliation for Christchurch', Sri Lanka claim | ख्राईस्टचर्च येथील मशिदीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी घडवले साखळी बॉम्बस्फोट, श्रीलंकेचा दावा

ख्राईस्टचर्च येथील मशिदीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी घडवले साखळी बॉम्बस्फोट, श्रीलंकेचा दावा

Next

कोलंबो - रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिनाभरापूर्वी न्यूझीलंडमधील मशिदीत करण्यात आलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले, असे श्रीलंकेच्या उपसंरक्षण मंत्र्यांनी  आज संसदेत सांगितले. श्रीलंकेमध्ये रविवारी घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे 320 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर महिनाभरापूर्वी ख्राईस्टचर्च येथे दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला होता. 


रविवारी जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. या बॉम्बस्फोटात 320 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. 

 श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान, गोपनीय माहितीनुसार स्थानिक दहशतवाद्यांसह काही परदेशी दहशतवाद्यांचा या हल्ल्यामागे हत असण्याची शक्यता आहेत. त्यामुळे  या हल्ल्याच्या तपासामध्ये अन्य देशांनी मदत करावी, असे आवाहन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी केले आहे. 

  श्रीलंकेचे आरोग्यमंत्री रजिथा सेनारत्ने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, श्रीलंकेतील स्थानिक संघटना एनटीजे या हल्ल्यांमध्ये सामील आहे. मात्र त्यांचे बाहेरील संघटनांशी त्यांची हातमिळवणी झाली आहे की नाही याची आम्हाला माहिती नाही. या हल्ल्यांप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित हे स्थानिक आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय नेटवर्कच्या सहकार्याशिवाय असे हल्ले करता येऊ शकत नाहीत, 

Web Title: Initial probe shows Sri Lanka attacks were 'retaliation for Christchurch', Sri Lanka claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.