Indonesian man kills neighbour for asking about 'marriage plans' repeatedly | लग्न कधी करणार? असं टुमणं लावणा-या गर्भवती शेजारणीची हत्या
लग्न कधी करणार? असं टुमणं लावणा-या गर्भवती शेजारणीची हत्या

लग्न कधी करणार? या प्रश्नाचा किमान भारतासारख्या देशात जवळपास सगळ्यांनाच आयुष्यात कधीतरी सामना करावा लागतोच. पण इंडोनेशियामध्ये एक विचित्रच घटना समोर आली आहे. येथे सातत्याने लग्न कधी करणार असं विचारणा-या गर्भवती शेजारणीचा तरूणाने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
deccanchronicle.com ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियामधील कैंपुंग पसीर जोंग येथे ही घटना घडली. 28 वर्षांच्या फैज नुर्दीन या इसमाने शेजारच्या गर्भवती महिलेची हत्या केली. ही महिला फैज नुर्दीन याला सातत्याने लग्न कधी करणार हा प्रश्न विचारायची. 
सगळ्यांचं लग्न झालंय, लवकर लग्न करून टाक, कधी लग्न करणार आहेस असे अनेक प्रश्न ही महिला त्याला विचारायची.  कधी लग्न करणार आहेस हाच प्रश्न या महिलेने फैजला एकदिवस पुन्हा विचारला आणि त्याच्या थोड्यावेळानंतर फैज महिलेच्या घरी पोहोचला. त्यानंतर गळा दाबून तिचा त्याने खून केला. त्यानंतर फैजने महिलेच्या घरातून स्मार्टफोन आणि पैसे देखील चोरले. त्यानंतर आरोपी फैजने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी अखेर त्याला अटक केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी मारली, त्यामध्ये तो जखमी झाला आहे.  


Web Title: Indonesian man kills neighbour for asking about 'marriage plans' repeatedly
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.