मलेशियात भारतीय वंशाची शीख व्यक्ती पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 03:07 PM2018-05-22T15:07:55+5:302018-05-22T15:08:19+5:30

मलेशियात शीख समुदायाचे 1 लाख लोक राहातात.

Indian-origin Sikh man becomes Malaysia's first cabinet minister | मलेशियात भारतीय वंशाची शीख व्यक्ती पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदी

मलेशियात भारतीय वंशाची शीख व्यक्ती पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदी

Next

क्वालालंपूर-  मलेशियात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीची निवड झाली आहे. गोविंद सिंग देव असे त्यांचे नाव असून मलेशियातील अल्पसंख्याक समुदायातील मंत्री होणारे ते पहिलेच मंत्री आहेत.

देव हे 45 वर्षांचे असून त्यांच्याकडे कम्युनिकेशन आणि मल्टिमीडिया हे खाते देण्यात आले आहे. त्यांच्याबरोबरच नव्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या आणखी एका व्यक्तीची मंत्रिमंडळात निवड झाली आहे. एम. कुलसेहरन हे डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टीचे सदस्य असून त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले आहे.


गोविंद सिंग देव पुचोंग मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्त्व करतात. त्यांचे वडिल करपाल सिंग हे मलेशियात वकिल आणि राजकीय नेते होते. देव यांना काल नॅशनल पॅलेस येथे शपथ देण्यात आली. या सोहळ्य़ात जगातील निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध नेते म्हणून ओळखले जाणारे आणि मलेशियाचे नवे पंतप्रधान महाथिर मोहम्मद आणि इतर कॅबिनेट सदस्यांनीही शपथ घेतली.

2008 साली देव पहिल्यांदा मलेशियाच्या संसदेत खासदार झाले. त्यानंतर वाढीव मताधिक्याने 2013 साली ते पुन्हा निवडून गेले. आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते 47 हजार 635 मतांनी विजयी झाले आहेत. देव यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पंजाबी समुदायाने आनंद व्यक्त केला आहे. मलेशियात साधारणपणे 1 लाख शीख लोक राहातात.

Web Title: Indian-origin Sikh man becomes Malaysia's first cabinet minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.