भारत अमेरिकेकडून घेणार खनिज तेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 04:53 AM2017-08-18T04:53:03+5:302017-08-18T04:53:07+5:30

भारताने अमेरिकेकडून प्रथमच १०० दशलक्ष डॉलर किंमतीचे खनिज तेल खरेदी केले

India will take from the United States of mineral oil! | भारत अमेरिकेकडून घेणार खनिज तेल !

भारत अमेरिकेकडून घेणार खनिज तेल !

Next

वॉशिंग्टन : भारताने अमेरिकेकडून प्रथमच १०० दशलक्ष डॉलर किंमतीचे खनिज तेल खरेदी केले असून अमेरिकेच्या टेक्सास राज्यातून खनिज तेल घेऊन निघालेले पहिले जहाज सप्टेंबरच्या तिसºया आठवड्यात ओडिशाच्या पारादीप बंदरात पोहोचणे अपेक्षित आहे.
अमेरिकेने आपल्या देशातील खनिज तेलाच्या निर्यातीवर ४० वर्षे बंदी घातली होती. दोन वर्षांपूर्वी तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ही बंदी उठविली. गेल्या २६ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिला भेटीत ऊर्जा क्षेत्रात उबय देशांचे संबंध अधिक बळकट करण्याचे ठरले. त्यानंतर ट्रम्प यांनी भारताच्या ऊर्जेच्या गरजा भागविण्यास अमेरिका दीर्घकालीन व विश्वासार्ह भागीदार बनेल, अशी ग्वाही दिली.
पेट्रोलियम उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेने खनिज तेलाचे उत्पादन कमी केल्याने विशेषत: आखाती देशांतील तेलांच्या किमती वाढल्या. त्यामुळे वाहतुकीचा खर्च धरूनही अमेरिकेचे खनिज तेल किफायतशीर झाले. या संधीचा फायदा घेत इंडियन आॅईल आणि भारत पेट्रोलियम या भारताच्या दोन सरकारी कंपन्यांनी अमेरिकेकडून चार दशलक्ष बॅरल खनिज तेल खरेदीचे व्यवहार केले.
भारतीय कंपन्यांनी अमेरिकेच्या टेक्सास राज्यातून हे खनिज तेल खरेदी केले आहे. भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना यांनी बुधवारी टेक्सासचे गव्हर्नर ग्रेरग अ‍ॅबॉट यांना या तेलखरेदीचे औपचारिक दस्तावेज सुपूर्द केले.
त्यानंतर भारतीय वकिलातीने टिष्ट्वट करून या घटनेचे पथदर्शक घटना म्हणून वर्णन करत सरना व अ‍ॅबॉट यांच्या भेटीची छायाचित्रेही प्रसिद्ध केली. (वृत्तसंस्था)
>चौथा प्रमुख देश
ओबामा यांनी निर्यातबंदी उठविल्यानंतर अमेरिकेचे खनिज तेल खरेदी करणारा भारत हा जपान, चीन व दक्षिण कोरियानंतर आशिया खंडातील चौथा प्रमुख देश ठरला. जागतिक पातळीवर भारताचा तेल आयातीत तिसरा क्रमांक लागतो.

Web Title: India will take from the United States of mineral oil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.