'सबांग'मुळे भारत होणार 'दबंग'; चीनच्या मनसुब्याला लावणार सुरुंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 03:17 PM2019-03-21T15:17:44+5:302019-03-21T15:26:34+5:30

घुसखोरी करणाऱ्या चीनला टक्कर देण्यासाठी भारताने नवा मार्ग शोधला आहे. यासाठी इंडोनेशियासोबत मिळून बंदराची निर्मिती करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे.

india is developing sabang port in indonesia to counter china in indo pacific strategy | 'सबांग'मुळे भारत होणार 'दबंग'; चीनच्या मनसुब्याला लावणार सुरुंग 

'सबांग'मुळे भारत होणार 'दबंग'; चीनच्या मनसुब्याला लावणार सुरुंग 

googlenewsNext

जकार्ता : घुसखोरी करणाऱ्या चीनला टक्कर देण्यासाठी भारताने नवा मार्ग शोधला आहे. यासाठी इंडोनेशियासोबत मिळून बंदराची निर्मिती करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. यामुळे चीनच्या बेल्ट अॅण्ड रोड इनिशटिव्ह (बीआरआय) प्रोजक्टला टक्कर देता येऊ शकेल. या प्रोजक्टमुळे चीन हिंद महासागरात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
इंडोनेशियासोबत मिळून भारत सबांग बंदराची निर्मिती करत आहे. यामुळे मुख्यत: भारताला दोन फायदे होणार आहेत. एक म्हणजे, साऊथ ईस्ट एशियाच्या बाजारापर्यंत भारत पोहचू शकतो. तसेच, सैनिकी डावपेच यासाठी भारताला याचा प्लस पॉइंट मिळेल.  

लुक ईस्ट पॉलिसीचा अर्थ बदलला...
पी. व्ही. नरसिम्हा राव यांचे सरकार असल्यापासून ते आत्तापर्यंत पूर्वेकडील क्षेत्र व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजले जाते. आसियान देशांसोबत सुद्धा याच्याशी संबंध केंद्रित आहेत. मात्र, हिंद महासागरात चीन आपला दबदबा निर्माण करण्यासाठी रणनीतीने काम करत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लुक ईस्ट पॉलिसीच्या अॅक्ट ईस्टमध्ये बदल केला आहे.  

चीनला रोखने सोपे नाही, मात्र गरजेचे आहे...
भारत आणि चीनमधील संबंध वेगवेगळ्या मुद्द्यावर भिन्न-भिन्न आहेत. त्यामुळे चीनला प्रतिकार करणे गरजेचे आहे. मात्र, ते इतके सोपे नाही. खरंतर, आसियानमध्ये चीन सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे. 2008 मध्ये चीनची गुंतवणूक जवळपास 192 बिलियन डॉलर इतकी होती. त्यामध्ये 2018 साली वाढ होऊन 515 कोटी डॉलर झाली. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2018 मध्ये इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी येथील सरकारसोबत अनेक करार केले. इंडोनेशिया हिंद महासागरात भारताला सहयोग करण्यासाठी तयार आहे. गेल्या जुलै महिन्यात भारताच्या नौदलाची आयएनएस सुमित्रा युद्धनौका बंदरावर गेली होती. त्यानंतर मार्च 2019 मध्ये आयएनएस विजित चार दिवसांसाठी सबांग बंदरावर गेली होती. 
 

Web Title: india is developing sabang port in indonesia to counter china in indo pacific strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.