imran khan is homosexual had affair with many party members says exwife | इमरान खानचे पक्षातल्या अनेक नेत्यांशी समलैंगिक संबंध, रेहमचा पुस्तकातून खळबळजनक गौप्यस्फोट
इमरान खानचे पक्षातल्या अनेक नेत्यांशी समलैंगिक संबंध, रेहमचा पुस्तकातून खळबळजनक गौप्यस्फोट

इस्लामाबाद- लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर रेहम खाननं पूर्वाश्रमीचा पती इमरान खान हा समलैंगिक असल्याचा आरोप केला आहे. रेहम खाननं स्वतःच्या पुस्तकात इमरान खान समलिंगी असल्याचं म्हटलं आहे. तसेच इमरान खानचं त्यांच्याच पक्ष तहरीक-ए-इन्साफमधल्या अनेक सदस्यांशी लैंगिक संबंध आहेत. 

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, इमरानचा पाकिस्तानी अभिनेता हमजा अली अब्बासी आणि पीटीआय सदस्य मुराद सईद यांच्याशी समलैंगिक संबंध होते. परंतु यावर इमरान आणि हमजा यांनी काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर मुराद सईद यानं ट्विटरवरून रेहम खानचे आरोप फेटाळले आहेत. सईद लिहितात, जे काही घाणेरडे माझ्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे, त्यावर बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. त्या कोणाच्या इशा-यावरून हे सगळं करत आहेत हे आम्हाला माहीत आहे. रेहम खाननं तत्पूर्वी पूर्वाश्रमीचा पती इमरान खानविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. रेहमच्या मते, जेव्हा तिनं दुस-यांदा इमरानची भेट घेतली होती, त्यावेळी त्याच्याबरोबर ती फिरायला गेली होती. त्यावेळीच इमराननं तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. 

जेव्हा आम्ही फिरायला गेलो तेव्हा इमराननं राजकारण आणि स्वतःच्या मुलांसंदर्भात माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग त्यांनी माझी छेड काढली. त्यावेळी माझ्या मनात भीतीनं घर केलं. मग विचार केला, मी इथे कशाला आली. त्यानंतर इमरान म्हणाला, मला माहीत आहे, तू तशी मुलगी नाहीस. म्हणूनच मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी म्हटलं तुम्ही वेडे झाला आहात. 

मी तुम्हाला ओळखतही नाही आणि तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे. रेहमनं या सगळ्या गोष्टी पुस्तकात लिहिल्यानंतर तिचं हे पुस्तक चर्चेत आलं. रेहमच्या पुस्तकातील काही वाद हे ऑनलाइन लीक झाले आहेत. रेहमनं पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमवर ही गंभीर आरोप केले आहेत. तसेच वसीमनं पत्नीला एका परपुरुषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोपही रेहमनं आपल्या पुस्तकात केला आहे. 

English summary :
Rehman Khan, the husband of former premier Imran Khan, is alleged to be gay after the sexual harassment charges.


Web Title: imran khan is homosexual had affair with many party members says exwife
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.