झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केल्यास त्याला स्वाधीन करू, मलेशिया सरकार

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 5:45pm

क्वालालंपूर- मुस्लिम तरुणांना भडकावू भाषण देऊन चिथावणारा मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

क्वालालंपूर- मुस्लिम तरुणांना भडकावू भाषण देऊन चिथावणारा मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केल्यास त्याला भारताच्या स्वाधीन करू, असं विधान मलेशिया सरकारनं केलं आहे. नाईकवर दहशतवाद्यांना निधी पुरवणं, हवालामार्फत पैसा कमावल्याचा आरोप आहे. त्यामुळेच तो सध्या मलेशियात फरार झाला आहे. परंतु जर भारत सरकारनं झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केली तर त्याला भारताच्या हवाली करण्यात येईल, असंही मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद जाहीद हमिदी यांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे. तसेच भारतानं अजूनपर्यंत अशी मागणी केली नसल्याचंही सांगितलं आहे. झाकीर नाईकनं मलेशियातील कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळे त्याचा पासपोर्ट अवैध ठरवता येणार नाही. भारतानंही या प्रकरणात मलेशिया सरकारला पत्र पाठवल्याचं समोर आलं आहे.  धार्मिक प्रवचनांच्या नावाखाली कट्टर इस्लामचा प्रचार करत तरुणांची डोकी भडकविण्यासह इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी भारतातील तपास यंत्रणांना हवा असलेला वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक याला कायम वास्तव्याचा परवान्याद्वारे मलेशियाने आसरा दिला आहे. पाच वर्षे मलेशियात राहात असलेल्या झाकिर नाईकने येथे बस्तान बसविले आहे. पंतप्रधानांसह बड्या मंडळींसोबत ऊठबस असलेला नाईक स्वत:हून भारतात परतण्याची किंवा त्याला पाठविले जाण्याची शक्यता नाही. गेल्याच आठवड्यात भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाईकविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग’च्या गुन्ह्याबद्दल आरोपपत्र दाखल केले होते. ब्रिटन व बांगलादेशने प्रवेशबंदी घातलेल्या नाईकला मलेशियाने आसरा दिल्याने या बहुधर्मी देशात कट्टर इस्लामी विचारांचा पगडा वाढत असल्याचे जाणकारांना वाटते. पंतप्रधान नजिब रझ्झाक यांच्या सत्ताधारी आघाडीला सन २०१३च्या निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर त्यांनी बहुसंख्येने असलेल्या मुस्लिमांचे तुष्टिकरण करण्यासाठी कट्टरपंथी विचारसरणीशी सलगी केल्याचे दिसते. पंतप्रधान रझ्झाक व इतर मंत्री जेथे नमाज पढतात, त्या कुआलालंपूरमधील मशिदीत नाईक प्रवचने देतो. अंगरक्षकासह मशिदीतून बाहेर पडल्यावर त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याची छायाचित्रे गेल्या महिन्यात झळकली होती. त्याआधी पंतप्रधान रझ्झाक व उपपंतप्रधान अहमद झाहिद हमिदी यांनी नाईकसोबतचे फोटो फेसबूकवर टाकले होते. नाईक महिनाभर नियमित प्रवचने देत असल्याचे मशिदीच्या प्रशासकांनी सांगितले. त्याची अन्य मशिदींतील प्रवचने ऐकल्याचे व त्याला इस्पितळे व उपाहारगृहांमध्ये फिरताना पाहिल्याचे लोक सांगतात. नाईकने भारतातील न्यायालयांनी काढलेल्या समन्सना प्रतिसाद दिलेला नाही. मात्र अन्य माध्यमांतून आरोपांचे खंडन केले आहे. पुत्रा मशिदीतून बाहेर पडल्यावर एका वृत्तसंस्थेच्या महिला प्रतिनिधीने भारतातातील खटल्यांविषयी विचारता नाईकने, ‘एका स्त्रीशी असे जाहीरपणे बोलणे प्रशस्त वाटत नाही’, या शब्दांत उत्तर देण्याचे टाळले होते.

झुकते माप नाही झाकिर नाईकना कायम वास्तव्याचा परवाना देताना झुकते माप दिलेले नाही. गेली पाच वर्षे ते मलेशियात राहात आहेत व त्यांनी कायदा व नियम मोडल्याचे एकही प्रकरण नाही. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याचे किंवा अटक करण्याचे कारण नाही. दहशतवादाशी संबंधित खटल्यांतील आरोपी म्हणून नाईक याच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव भारत सरकारकडून आलेला नाही. - अहमद झाहिद हमिदी, उपपंतप्रधान, मलेशिया (संसदेतील निवेदन)

संबंधित

वाकड येथे दुचाकी अडवून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार 
 लाचप्रकरणी शिरोळ पंचायत समितीच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
....अशी झाली होती कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदीला अटक
धुळ्यात तरुणाचा मृतदेह आढळला
एकतर्फी प्रेमातून त्याने तिला मारली मिठी, वाचा पुढे काय झाले ?

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

S-400 करार :CAATSA निर्बंधांबाबतचा निर्णय भारताला लवकरच कळेल, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
"मी राजकारणात आल्यास तिस-या महायुद्धाला कारण ठरेन"
ग्रेनेड हल्ला प्रकरण : बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला जन्मठेप, १९ जणांना फाशी
#MeToo मोहिमेची वर्षपूर्ती; आरोप ५० जणांवर, पण शिक्षा एकालाच
दुष्काळामुळे बिघडते मानसिक स्वास्थ्य; तज्ज्ञांनी मांडले निरीक्षण

आणखी वाचा