पेहचान कौन? किती चेहरे आपल्या लक्षात राहातात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 01:49 PM2018-10-11T13:49:43+5:302018-10-11T13:52:32+5:30

दिवसभरामध्ये आपल्याला स्मार्टफोनवर, टीव्हीवर दिसणारे आणि प्रत्यक्ष समोर असणारे चेहरे लक्षात कसे राहातात याचा विचार या अभ्यासात करण्यात आला. या अभ्यासावर आधारित शोधनिबंध रॉयल सोसायटी बी मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

How many faces do people remember? | पेहचान कौन? किती चेहरे आपल्या लक्षात राहातात?

पेहचान कौन? किती चेहरे आपल्या लक्षात राहातात?

Next

न्यू यॉर्क- घरामध्ये, कामाच्या ठिकाणी, प्रवासात दररोज भरपूर लोक आपल्या समोरुन जात असतात. तसेच टीव्ही वाहिन्या, बातम्यांच्या वाहन्या यातूनही अनेक चेहऱ्यांना आपण पाहात असतो. मात्र प्रत्येक व्यक्ती ५००० चेहरे ओळखू शकतो असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. युनिव्हर्सिटी आॅफ यॉर्कने प्रसिद्ध आपल्या चेहरा ओळखण्याच्या क्षमतेबाबत अभ्यास केला आहे.
  
दिवसभरामध्ये आपल्याला स्मार्टफोनवर, टीव्हीवर दिसणारे आणि प्रत्यक्ष समोर असणारे चेहरे लक्षात कसे राहातात याचा विचार या अभ्यासात करण्यात आला. या अभ्यासावर आधारित शोधनिबंध रॉयल सोसायटी बी मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना आपण किती जणांचे चेहरे ओळखू शकता असे प्रश्न विचारण्यात आले होते. 

यॉर्कच्या मानसशास्त्र विभागातील अध्यापक रॉब जेन्किन्स यांनी या अभ्यासाबद्दल आपले मत सांगितले आहे. आपल्याला आयुष्यामध्ये मित्र, सहकारी, प्रसिद्ध व्यक्ती आणि अनेकांना चेहऱ्यावरुन ओळखण्याची सवय झालेली असते. पण आपल्याला नक्की किती चेहरे ओळखता येतात याचा कोणीच अभ्यास केला नव्हता. या निरीक्षणामध्ये सहभागी लोकांना १००० ते १०,००० चेहरे ओळखता येत असल्याचे लक्षात आले. लोकांना सरासरी ५००० चेहरे ओळखता येतात असं आम्हाला अभ्यासात दिसलं असे रॉब जेन्किन्स यांनी सांगितले. 

    लोकांची ही चेहऱ्याची भाषा आपण ओळखू शकलो तर फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअरची निर्मिती करता येईल आणि त्याचा वापर विमानतळांवर तसेच गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी करता येईल असं त्यांचं मत आहे. अशा सॉफ्टवेअरचा उपयोग अनोळखी चेहऱ्यांची ओळख पटवण्यासाठीही केला जाऊ शकतो.  या अभ्यासकांच्या मते काही लोकांमध्ये आणखी चेहरे ओळखता येण्याची आणि अमर्याद चेहरे लक्षात ठेवण्याची क्षमता असू शकते.   
पुरेशा सरावामुळे ते अमर्याद चेहरे लक्षात ठेवू शकतात. शब्द आणि भाषा लक्षात ठेवण्याची मेंदूमध्ये अमर्याद शक्ती असते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हजारो चेहऱ्यांमध्ये फरक ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये का तयार झाली असावी हे आजूनही स्पष्ट झाले नसल्याचे जेन्किन्स यांनी सांगितले. 

Web Title: How many faces do people remember?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.