इथे मिळते महिलांनाही पुरुषांइतकेच वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 2:04am

महिला कर्मचा-यांच्या वेतनापेक्षा पुरुषांना जास्त वेतन देणे बेकायदा ठरवणारा जगातला पहिला देश आईसलँड बनला आहे. पुरूष आणि महिला यांना समान वेतन देणारा कायदा एक जानेवारी २०१८ पासून अमलात आला.

महिला कर्मचा-यांच्या वेतनापेक्षा पुरुषांना जास्त वेतन देणे बेकायदा ठरवणारा जगातला पहिला देश आईसलँड बनला आहे. पुरूष आणि महिला यांना समान वेतन देणारा कायदा एक जानेवारी २०१८ पासून अमलात आला. २५ पेक्षा जास्त कर्मचाºयांची नियुक्ती करणाºया कंपन्यांना त्या समान वेतनाचा कायदा पाळतात, असे सरकारकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. हा कायदा मोडल्यास कंपन्यांना जबर दंड भरावा लागेल. पुरूष आणि महिला यांच्या वेतनातील फरक २०२२ पर्यंत दूर करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी (८ मार्च) या कायद्याची घोषणा केली गेली होती. आईसलँडीक विमेन्स राईट्स असोसिएशनच्या डॅग्नी ओस्क अराडोट्टीर पिंड म्हणाल्या की, केल्या जाणाºया प्रत्येक कामाचे मूल्यमापन करण्यासाठी कंपन्या आणि संघटनांसाठी हा कायदा म्हणजे मुळात एक यंत्रणा आहे. पुरूष आणि महिला यांना मालक समान वेतन देतो की नाही हे निश्चित झाल्यावर त्यांना या यंत्रणेद्वारे प्रमाणपत्र मिळते. या नव्या कायद्याला संसदेत आईसलँडच्या युती सरकारने पाठिंबा दिला तसेच विरोधकांनीही. संसदेत निम्म्या सदस्य या महिला आहेत.

संबंधित

बँक कर्मचारी उद्या दिल्लीवर धडकणार
गंगाखेड येथे थकीत वेतनासाठी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण
खादी उद्योगातील सात लाख रोजगार गेले! उत्पादन मात्र वाढले
 नागपूरचे  कामगार विमा रुग्णालय ‘आॅक्सिजनवर’
धक्कादायक वास्तव

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

पुतीन पुन्हा सत्तेत येणार, दीर्घकाळ सत्तेत राहाणारे हे नेते तुम्हाला माहिती आहेत का?
ऐकावे ते नवलच... कुत्रा म्हणून सांभाळलं अन् ते अस्वल निघालं!
अन् रशियामध्ये पडला सोनं आणि हिऱ्यांचा पाऊस 
फ्लोरिडात पादचारी पूल कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी
भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिकांचे अच्छे दिन!, बांगलादेश, भूतान हे देशही अधिक आनंदी

आणखी वाचा