टोकिओ : असे म्हणतात की, प्रेम आंधळे असते. जपानच्या राजकुमारीच्या बाबतीतही काहीसे असेच घडत आहे. जपानच्या राजेशाही कुटुंबातील प्रिंस अकिसीनो आणि कीको यांची मुलगी माको २५ वर्षांची आहे. माको एका सामान्य कुटुंबातील मुलाच्या प्रेमात पडली आहे. कोमुरो (२५) नावाचा हा तरुण पदवीधर आहे आणि एका बीचवर पर्यटन कर्मचारी आहे. एखाद्या चित्रपटाचे कथानक जसे वळण घेते तसेच या ठिकाणीही घडत आहे. माको - कोमुरो यांची पहिली भेट पाच वर्षांपूर्वी एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एका पार्टीत झाली होती. त्यानंतर हे दोघे प्रेमात पडले आणि आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या दोघांनी एका चर्चमध्ये विवाह केला असल्याचीही चर्चा आहे. विवाहापूर्वी येथील पादरीने माको हिला सांगितले होते की, विवाहानंतर ती राजकुमारी राहणार नाही. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे तिला जीवन जगावे लागेल. पण, माको मागे हटली नाही आणि तिने कोमुरोशी विवाह केला. माकोच्या कुटुंबियांचाही या विवाहाला विरोध नाही. रीतीरिवाजाप्रमाणे या दोघांचा विवाह करून देण्यात येणार आहे. माको या कुटुंबातील अशी पहिली मुलगी आहे जी राजेशाही घरातून बाहेर पडून विद्यापीठात जाऊन शिकली आहे.