नवी दिल्ली - हँडसम पुरुषांबद्दल तरुणी, बायकांना नेहमीच आकर्षण वाटते. असे पुरुष नेहमी बायकांमध्ये चर्चेचा विषय असतात. पण काहीवेळा तुम्हाला तुमच्या हँडसम असण्याची किंमत चुकवावी लागते. ओमर बोरकान अल गालाला 2013 साली खूप हँडसम दिसतो म्हणून सौदी अरेबियाने देश सोडायला सांगितले. ओमर बोरकानच्या सुंदर दिसण्यामुळे महिला बिघडू शकतात म्हणून 2013 साली त्याला देश सोडायला सांगितल्याचे वृत्त इंडिपेंडटने दिले होते. सौदी सरकारच्या या आदेशामुळे संपूर्ण जगभरात तो प्रसिद्ध झाला. पेशाने अभिनेता आणि छायाचित्रकार असलेल्या गालाचे अनेक चाहते असून एका चाहत्याने तर त्याला मर्सिडीज G55 कार भेट दिली.   

'ओरु आडार लव्ह' या सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्यातील एक दृश्यामुळे  प्रिया प्रकाश वारियर एका रात्रीत स्टार बनली आहे. पण सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होणारी प्रिया एकमेव नाहीय. 

अर्शद खान या पाकिस्तानी चहावाल्याला सोशल मीडियामुळे 2016 साली रातोरात प्रसिद्धी मिळाली. जिया अलीने त्याचा चहा विकतानाचा फोटो काढला आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला. या एका फोटोमुळे अर्शद इतका लोकप्रिय झाला कि, त्याला मॉडेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. 

पीट्रो बोसेलीला त्याच्या चाहत्यांनी जगातील सेक्सी गणित शिक्षकाचा टॅग दिला आहे. 2016 साली त्याचा फोटो व्हायरल झाला. पीट्रो लंडन विद्यापीठात गणित विषय शिकवतो. त्याचा फोटो एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.      

                   
   
चेह-यावरील हास्य आणि लुक्समुळे ली मीनवीला सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.  तो सिंगापूरच्या चांगी विमानतळावर पोलीस अधिकारी आहे. एसजीएजी या लोकल साईटवर 14 ऑक्टोंबर 2016 रोजी ली चा फोटो झळकला आणि त्यानंतर जगभरात त्याचे फोटो व्हायरल झाले. 


 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.