Hafiz Saeed's big shock in the new year, assets seized | नव्या वर्षात हाफिज सईदला पाकिस्तान सरकारकडून मोठा झटका, जप्त होणार संपत्ती
नव्या वर्षात हाफिज सईदला पाकिस्तान सरकारकडून मोठा झटका, जप्त होणार संपत्ती

इस्लामाबाद : मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद यांच्यावर थेट हात न टाकता त्याच्या धर्मादाय संस्था आणि संपत्ती ताब्यात घेऊन आर्थिक नाड्या आवळण्याचा बेत पाकिस्तान सरकारने आखला आहे.
हाफीजची संपत्ती कशी ताब्यात घेता येईल, यावर १९ डिसेंबर रोजी विविध प्रांतीय आणि संघीय सरकारच्या विविध खात्यांच्या अधिकाºयांच्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच त्या दृष्टीने योजना प्रांतीय व संघीय सरकारला २८ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निदेश देण्यात आले होते.
या उच्चस्तरीय बैठकीत सहभागी असलेल्या तीन वरिष्ठ अधिकाºयांनी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. १९ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या दस्तावेजानुसार सईदच्या दोन धर्मादाय संस्थांची नावे
आहेत. वित्तीय कृती गट ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांच्या आर्थिक रसदविरुद्ध काम करते. या संस्थेने अनेकदा दहशतवादी संस्थांचे आर्थिक स्त्रोत बंद करण्याबाबत पाकिस्तानला सल्ला दिला होता.
जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटना लष्कर-ए-तैयबाच्या मुखवटा असलेल्या संघटना आहेत, असे अमेरिकेने घोषित केले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास लष्कर-ए तैयबाच जबाबदार असल्याचा आरोप भारत आणि अमेरिकेने केला आहे. अमेरिकेनेही हाफीज सईदला दहशतवादी घोषित केलेले आहे. (वृत्तसंस्था)


Web Title: Hafiz Saeed's big shock in the new year, assets seized
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.