हे फीचर वापरून हॅकर्सनी हॅक केली फेसबुक अकाउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 09:00 AM2018-09-29T09:00:00+5:302018-09-29T09:00:21+5:30

जगभरातील फेसबुकच्या 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

Hackers hacked Facebook account using this feature! | हे फीचर वापरून हॅकर्सनी हॅक केली फेसबुक अकाउंट!

हे फीचर वापरून हॅकर्सनी हॅक केली फेसबुक अकाउंट!

Next

वॉशिंग्टन- जगभरातील फेसबुकच्या 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. युजर्सचा डेटा वारंवार चोरीला जात असल्यानं फेसबुकच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक नवं नवे फीचर्स आणत असतो. अशाच एका फीचर्सच्या माध्यमातून हॅकर्सनी हा डेटा हॅक केला आहे. फेसबुक युजर्सना त्यांचं प्रोफाईल इतरांना कसं दिसतं हे पाहण्यासाठी 'View As' हे फिचर वापरलं जातं.

हॅकर्सनी हल्ला करण्यासाठी या फीचर्समधील बगचा वापर केला. बग शोधून फेसबुकचे अॅक्सेस मिळवले आणि त्याच्या माध्यमातून अकाऊंट हॅक केली. टोकन अॅक्सेस या डिजिटल कीच्या मदतीनं फेसबुकचं अकाऊंट हे लॉग इन राहातं, त्यामुळे अकाऊंट सुरू करताना पुन्हा पासवर्डची गरज भासत नाही. त्याचाच फायदा घेत हॅकर्सनं ही अकाऊंट हॅक केली आहे. त्यामुळे फेसबुकनं तुम्हाला पासवर्ड न बदलता फक्त लॉग आऊट करून लॉग इन करण्याचा सल्ला दिला आहे. जगभरातल्या जवळपास 5 कोटी युजर्सना याचा फटका बसला आहे, परंतु देशागणिक आकडेवारी उपलब्ध नसल्याचे फेसबुकने आयर्लंडमधील डेटा नियामक संस्थेला माहिती दिली आहे.

कंपनीने युजर्सना लॉग आऊट करून पुन्हा लॉग इन करण्यात सांगितले आहे. तसेच युजर्सनं पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा आमच्याकडून तपास सुरू आहे. हॅक करण्यात आलेल्या अकाऊंटची माहिती चोरली का, त्याचा गैरवापर झाला का, याची अद्याप पुष्टी झालेली नाही, असं कंपनीनं म्हणणं आहे. आमच्यासाठी युजर्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे जे घडलं त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, असं म्हणत फेसबुकनं युजर्सची माफी मागितली आहे. 

Web Title: Hackers hacked Facebook account using this feature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.