या आजी चालतात रोज २४ किमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:27 AM2018-02-05T01:27:50+5:302018-02-05T01:28:04+5:30

चीनच्या गुंआक्शी प्रांतातील एका छोट्या गावात राहणारी या ७६ वर्षे वयाच्या आजी रोज आपल्या नातवाला घेऊ न शाळेत जातात आणि परतही घेऊन येतात.

This grandmother runs 24 km daily | या आजी चालतात रोज २४ किमी

या आजी चालतात रोज २४ किमी

बीजिंग- चीनच्या गुंआक्शी प्रांतातील एका छोट्या गावात राहणारी या ७६ वर्षे वयाच्या आजी रोज आपल्या नातवाला घेऊ न शाळेत जातात आणि परतही घेऊन येतात. अनेक वर्षांचा हा त्यांचा दिनक्रम आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी नातवाला रोज शाळेत नेईन आणि आणेन, असे त्या सांगतात. त्यांचा नातू सेलिब्रल पाल्सीचा रुग्ण आहे. त्याला चालता येत नाही. त्यामुळे त्याला व्हीलचेअरवर बसवून शाळेत नेण्याची जबाबदारी त्यांनी स्वत:च स्वीकारली आहे. अर्थात, घरात त्या व नातू यांच्याखेरीज कोणीच नाही. त्यामुळे त्यांना हे करावेच लागते. गेली चार वर्षे ते त्याला सकाळी उठविणे, त्याचे आवरणे, त्याला जेवू घालणे, शाळेत नेणे आणि आणणे ही कामे करत आहेत. मुलाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. आईने दुसरा विवाह केला आणि वडीलही रोजगारासाठी कुठेतरी दुसºया गावी निघून गेले. या मुलाच्या वा आपल्या आईच्या खर्चासाठी त्यांच्याकडून एक पैसाही येत नाही. या आजींना जे पेन्शन मिळते, त्यातूनच नातवाची फी आणि घरचा सारा खर्च भागविला जातो. उपचारानंतरही नातू बरा झाला नाही. डॉक्टरांची फी देण्यासाठी घेतलेले कर्ज त्या आजही कसेबसे फेडत आहेत. त्याला शाळेत न्यायला व्हीलचेअर विकत घेणेही आजींना शक्य नव्हते. स्थानिक सरकारी अधिकाºयांनी ती त्यांना मिळवून दिली.

Web Title: This grandmother runs 24 km daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.