बोस्टनमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 08:36 AM2018-09-14T08:36:06+5:302018-09-14T09:01:24+5:30

अमेरिकेतील बोस्टनमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

Gas pipeline blast in Boston, 6 injured6 injured, hundreds evacuated after dozens of explosions hit gas pipeline in Boston | बोस्टनमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी

बोस्टनमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी

Next

वॉशिंग्टन - अमेरिकेतील बोस्टनमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. आतापर्यंत जवळपास 70 वेळा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून शेकडो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मोठ्याप्रमाणात बचावकार्य सुरू आहे. 


स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस पाईपलाईन अपग्रेड करण्याचं काम सुरू असताना हे स्फोट झाले. या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी लॉरेंस जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या परिसरातील वीज काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Gas pipeline blast in Boston, 6 injured6 injured, hundreds evacuated after dozens of explosions hit gas pipeline in Boston

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.