अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केली आपल्यासोबत गंदी बात, अभिनेत्रीचा सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 08:38 PM2017-10-25T20:38:27+5:302017-10-25T20:42:55+5:30

अमेरिकी अभिनेत्री हेदर लिंड हिने अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर सनसनाटी आरोप केला आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी एका टीव्ही शो दरम्यान आपल्याला चुकीच्या पद्धतीने...

The former US President made a filthy talk with the sensational allegation of the actress | अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केली आपल्यासोबत गंदी बात, अभिनेत्रीचा सनसनाटी आरोप

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केली आपल्यासोबत गंदी बात, अभिनेत्रीचा सनसनाटी आरोप

Next

न्यूयॉर्क - अमेरिकी अभिनेत्री हेदर लिंड हिने अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर सनसनाटी आरोप केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (सीनियर) यांनी  एका टीव्ही शो दरम्यान आपल्याला चुकीच्या पद्धतीने हात लावून अश्लील विनोज ऐकवल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र माजी राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्यांना हे आरोप फेटाळून लावले आहेत. माजी राष्ट्रपतींनी विनोद म्हणून असे केले, कुणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांच्या कृतीमुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर माजी राष्ट्राध्यक्ष माफी मागत आहेत, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे.  
34 वर्षी अभिनेत्री हेदर हिने मंगळवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लिंड म्हणाली की, एका छायाचित्रात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासोबत 93 वर्षीय बुश यांना पाहून मला धक्का बसला. माजी राष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या सन्मानाची मला जाणीव आहे. या छायाचित्रात दिसणाऱ्या अनेक व्यक्तीबाबत मला गर्व आहे. चार वर्षांपूर्वी एका ऐतिहासिक टेलिव्हिजन कार्यक्रमाचे प्रमोशन करताना मला जॉर्ज बुश (सिनियर) यांना भेटण्याची संधी मिळाली होती. मात्र अशाच प्रकारच्या एका छायाचित्रासाठी पोझ देताना माझे लैंगिक शोषण झाले होते. 
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिंड लिहिते,"त्यांनी माझ्यासोबत हस्तांदोलन केले नाही. ते व्हिलचेअरवर बसलेले होते. त्यांनी मला मागून स्पर्श केला. यादरम्यान, त्यांची पत्नी बार्बरा या सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. दरम्यान बुश यांनी मला एक अश्लील विनोद ऐकवला. नंतर फोटो काढत असताना त्यांनी मला पुन्हा एकदा स्पर्श केला. ते पाहून बुश यांच्या पत्नीने त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. नंतर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मी त्यांच्या एवढ्या जवळ उभे राहता कामा नये होते, असे सांगितले."
 याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार इतर महिलांना धैर्य दाखवून आपले अनुभव कथन करताना पाहून मी ही घटना सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात अनेक अमेरिकी महिलांना हार्वे वाइंस्टाइन याच्यावर लैगिक शोषणाचे आरोप केले होते. तसेच अन्य अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांवरही आरोप झाले होते.  

Web Title: The former US President made a filthy talk with the sensational allegation of the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.