कोरियाच्या आकाशात शक्तीशाली बॉम्बर, F-35B विमानांचे उड्डाण ! किमच्या चॅलेंजला अमेरिकेचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 03:53 PM2017-09-18T15:53:48+5:302017-09-18T16:01:47+5:30

कोरियन द्विपकल्पात तणाव वाढलेला असताना सोमवारी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कोरियाच्या आकाशात जोरदार युद्ध सराव केला.

Flying Booster, F-35B Aircraft Flight in Korea's Sky! North America's Kim Challenge | कोरियाच्या आकाशात शक्तीशाली बॉम्बर, F-35B विमानांचे उड्डाण ! किमच्या चॅलेंजला अमेरिकेचे उत्तर

कोरियाच्या आकाशात शक्तीशाली बॉम्बर, F-35B विमानांचे उड्डाण ! किमच्या चॅलेंजला अमेरिकेचे उत्तर

Next
ठळक मुद्देअमेरिकेला लवकरच सर्वात मोठी वेदना सहन करावी लागेल असा इशारा उत्तर कोरियाच्या राजदूताने दिला होता.

सेऊल, दि. 18 - कोरियन द्विपकल्पात तणाव वाढलेला असताना सोमवारी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कोरियाच्या आकाशात जोरदार युद्ध सराव केला. उत्तर कोरियाने शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पाठोपाठ क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे कोरियन द्विपकल्पात युद्धाचे ढग जमा झाले आहेत. अमेरिकेची चार F-35B स्टेलथ फायटर जेट आणि दोन B-1B बॉम्बर विमाने सरावात सहभागी झाली होती. 

मागच्याच आठवडयात उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेले सर्व निर्बंध धुडकावून लावत अमेरिकेला धमकी दिली. अमेरिकेला लवकरच सर्वात मोठी वेदना सहन करावी लागेल असा इशारा उत्तर कोरियाच्या राजदूताने दिला होता. उत्तर कोरियाने तीन सप्टेंबरला शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. त्यानंतर शुक्रवारी जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले. अमेरिकेने आपल्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमानाद्वारे उत्तर कोरियाला हवाई ताकद दाखवून दिली. उत्तर कोरियावर जरब बसवणे हा उड्डाणामागे हेतू आहे. 

अमेरिकन आणि दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांचे एकत्रित उड्डाण हा नियमित सरावाचा भाग होता. संयुक्त कारवाईची क्षमता वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या कवायती यापुढेही सुरु राहतील असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. दक्षिण कोरियाची चार F-15K फायटर जेट विमाने या सरावात सहभागी झाली होती. यापूर्वी 31 ऑगस्टला अशा प्रकारचा युद्ध सराव करण्यात आला होता. उत्तर कोरियानवे बेजबाबदारपणे जी शस्त्रास्त्रांची स्पर्धा चालवली आहे ती तात्काळ बंद करावी अन्यथा उत्तर कोरियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा वारंवार अमेरिकेकडून इशारा देण्यात येत आहे. तरीही उत्तर कोरियाच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही. 

संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाच्या कापड निर्यातीवर बंदी आणली असून, तेल आयात करण्यावरही मर्यादा आणल्या आहेत. यूएनच्या निर्बंधामुळे उत्तर कोरियाच्या कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेला थोडी झळ बसेल. कापड उद्योगात चीन उत्तर कोरियाचा सर्वात मोठा भागीदार आहे. उत्तर कोरियातूननिर्यात चीनला  80 टक्के कापड निर्यात होते. अमेरिकेतीलही काही कापड उद्योजक उत्तर कोरियावर अवलंबून आहेत. 
 

Web Title: Flying Booster, F-35B Aircraft Flight in Korea's Sky! North America's Kim Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.