Firing at Central Michigan University, USA | अमेरिकेतील सेंट्रल मिशिगन विद्यापीठात गोळीबार, दोघांचा मृत्यू
अमेरिकेतील सेंट्रल मिशिगन विद्यापीठात गोळीबार, दोघांचा मृत्यू

मिशिगन : अमेरिकेतील सेंट्रल मिशिगन विद्यापीठात गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल मिशिगन विद्यापीठात एका अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यापीठाच्या चॅम्पबेल हॉलमध्ये हा गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करणा-या संशयित व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची शक्यता माउंट प्लीझंट पोलिसांनी व्यक्त केली आहे. 
दरम्यान, या हल्ल्यात आणखी काही जीवितहाणी झाली आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर येत नाही.    


Web Title: Firing at Central Michigan University, USA
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.