फेसबुकचा ६0 कंपन्यांशी डेटा देण्याचा करार, न्यू-यॉर्क टाइम्सची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:14 AM2018-06-05T00:14:24+5:302018-06-05T00:14:24+5:30

जगातील सर्वात प्रभावी समाजमाध्यमांपैकी असलेल्या फेसबुकने मोबाइल बनविणाऱ्या ६० कंपन्यांशी डेटाच्या देवाणघेवाणीचे करार केले आहेत. त्यात अ‍ॅपल व मायक्रोसॉफ्टचाही समावेश आहे.

Facebook's data to enter data with 60 companies, New York Times information | फेसबुकचा ६0 कंपन्यांशी डेटा देण्याचा करार, न्यू-यॉर्क टाइम्सची माहिती

फेसबुकचा ६0 कंपन्यांशी डेटा देण्याचा करार, न्यू-यॉर्क टाइम्सची माहिती

Next

वॉशिंग्टन : जगातील सर्वात प्रभावी समाजमाध्यमांपैकी असलेल्या फेसबुकने मोबाइल बनविणाऱ्या ६० कंपन्यांशी डेटाच्या देवाणघेवाणीचे करार केले आहेत. त्यात अ‍ॅपल व मायक्रोसॉफ्टचाही समावेश आहे. या कंपन्यांनी फेसबुकच्या माहिती मुक्तहस्ते वापर केल्याची बाब अमेरिकेतील एका वृत्तपत्राने उजेडात आणली आहे.
फेसबुकवरील लाखो लोकांची माहिती चोरून केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी वापरली होती. हे उघडकीस आल्याने फेसबुकची धोक्यात आली. फेसबुककडून विविध कंपन्यांना माहितीची देवाणघेवाण कशी होत होती, याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
लोकांची माहिती अन्य कोणालाही वापरू देणार नाही असे फेसबुकने जाहीर केले होते. परंतु फेसबुकने हे पाळले नाही. करार केलेल्या ६० कंपन्यांना फेसबुकने आपल्या खातेदारांची माहिती मुक्त हस्ते वापरू दिली, असे
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Facebook's data to enter data with 60 companies, New York Times information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.