इंग्लडच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे

By Admin | Published: July 13, 2016 10:46 PM2016-07-13T22:46:40+5:302016-07-13T22:56:56+5:30

इंग्लडच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे यांची बुधवारी निवड करण्यात आली आहे. डेव्हीड कॅमेरून यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी थेरेसा मे यांची पतप्रधानपदी नियुक्ती केली.

England's Theresa May | इंग्लडच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे

इंग्लडच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १३ - इंग्लडच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे यांची बुधवारी निवड करण्यात आली आहे. डेव्हीड कॅमेरून यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी  थेरेसा मे यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपविली आहे. इंग्लंडच्या त्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मे यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अँन्ड्रिया लिडसोम यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्यामुळे थेरेसा मे यांना कोणीही प्रतिस्पर्धी उरला नाही. तसेच, इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे थेरेसा मे स्वीकारतील असे डेव्हीड कॅमेरून यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.

Web Title: England's Theresa May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.