जगात १२ जून हा जागतिक मांसमुक्त दिन साजरा केला जातो. जर जग अचानक शाकाहारी बनले, तर त्याचे काय परिणाम असतील? जलवायू, वातावरण, आमचे आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर याचे काय परिणाम असतील हे आम्ही सांगतो आहोत.

२०५० पर्यंत जग शाकाहारी बनले, तर दरवर्षी ७० लाख लोक कमी मरण पावतील व जनावरांशी संबंधित उत्पादने अजिबात खाल्ले नाहीत तर दरवर्षी ८० लाख लोक कमी मरण पावतील.
आॅक्सफर्ड मार्टिन स्कूल फ्युचर आॅफ फूड प्रोगॅ्रममधील संशोधक मार्को स्प्रिंगमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्यसामुग्रीशी संबंधित उत्सर्जनात ६० टक्के घट होईल. रेड मीटपासून मुक्तीमुळे हे घडेल. कारण रेड मीट मिथेन गॅस बाहेर सोडणाऱ्या जनावरांपासून मिळते.
मांसाची विक्री कमी झाल्यास हृदयविकार, मधुमेह, अर्धांगवायू व कर्करोगाची शक्यता संपून जाईल. जगात सकल देशी उत्पादनाचा दोन किंवा तीन टक्के पैसा उपचारांवर खर्च होतो तो होणार नाही.
यामुळे विकसनशील जगातील शेतकऱ्यांचे जबर नुकसान होईल. आफ्रिकेत सहाराच्या जवळ सहेल लँड आहे व तेथील लोक उदरनिर्वाहासाठी पशुपालनावर विसंबून आहेत. या लोकांना तेथून दुसरीकडे कायमस्वरूपी स्थलांतर करावे लागेल व त्यामुळे त्यांची संस्कृती संकटात सापडेल.
जंगलात एक प्रकारचे संतुलन राहील. नाहीशी होत असलेली जैवविविधता वाचेल. आधी शाकाहारी जनावरांना वाचवण्यासाठी हिंसक जनावरांना ठार मारले जायचे.
जनावरांशी संबंधित उद्योगांत जे आहेत त्यांना नवा रोजगार शोधावा लागेल. ते कृषी, जैवऊर्जा आणि वनीकरणाकडे वळू शकतात. जर त्यांना दुसरा रोजगार मिळाला नाही, तर मोठ्या संख्येने ते बेरोजगार होतील व त्यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होईल.