डोरेमॉनमुळे मुलांच्या मनावर नकारात्मक विचार, पाकिस्तानच्या नेत्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत on Tue, January 02, 2018 5:39pm

डोरेमॉनसारखे कार्टून लहान मुलांच्या मनावर नकारात्मक भावना पसरवते, असा आरोप करत या पाकिस्तानी नेत्याने त्या कार्टूनवर बंदी आणायला लावली.

पाकिस्तान : कार्टुन म्हणजे प्रत्येकाचा आवडता विषय. त्यातही डोरेमॉन आणि नोबिता या दोन कॅरेक्टर कार्टुन्सप्रेमींच्या मनात एक वेगळं स्थान सांभाळून आहेत. नोबिताने काहीतरी घोळ घालणं आणि ते निस्तरायची जबाबदारी डोरेमॉनवर पडणं, हे तर नित्याचंच आहे. नोबिता हे पात्र आपल्या सगळ्यांमध्ये दडून बसलेलं आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात एखादा डोरेमॉन असावा असं सगळ्यांनाच वाटतं. जपानच्या एका कंपनीने सुरू केलेली ही कार्टुन सीरिज सगळ्यांनाच प्रचंड भावतंय. पण पाकिस्तानात मात्र या कार्टुनवर बंदी आहे. सगळ्यांनाच आवडणारं हे कार्टुन नकारात्मक विचार निर्माण करतं असा ठपका ठेवता या कार्टुनला पाकिस्तानात मज्जाव करण्यात आलाय.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोरेमॉन हे जपानी कार्टुन लहान मुलांच्या मनावर नकारात्मक विचार पसरवतात, त्यामुळे हे कार्टुन पाकिस्तानात बंद करण्यात आलंय. मात्र तरीही काही स्थानिक केबलचालक छुप्या पध्दतीने हे बंदी असलेले कार्टुन चॅनेलवर दाखवतात. पाकिस्तानमधील एक आमदार डॉ.मुरुड रस यांनी या कार्टूनवर हा आरोप केलाय. त्यांच्या मते पाकिस्तानात काही स्थानिक केबलचालक डोरेमॉनसारखे बंदी असलेले कार्टुन्स आपल्या चॅनेलवर दाखवतात. त्यामुळे अशा स्थानिक केबल चालकांनी असे कार्टुन्स दाखवू नयेत.

तसेच, डोरेमॉनसारखे अनेक कार्टुन्स पाकिस्तानमधील कलाकार बनवत असतात, त्यामुळे या जपानी कार्टुन्सवर बंदी आणून स्थानिक कलाकारांच्या कार्टुन्सला जास्त वेळ द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. डोरेमॉनच्या जागी कितीही कार्टुन्स आले तरीही डोरेमॉनची जागा कोणीच घेऊ शकत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून डोरेमॉन आणि नोबित या पात्रांनी लहान मुलांना भुरळ घातलीय. ए‌वढंच नव्हे तर लहान मुलांसोबत आज त्यांच्या मम्मी आणि कित्येक तरुणही हे कार्टुन आजही पाहतात.

संबंधित

पाक सरकारच्या कामात लष्कराने लुडबुड करू नये; इस्लामाबाद कोर्टाने सुनावले
शेती सुरु होण्यापूर्वीही मानवाने केला होता स्वयंपाक; 14,400 वर्षांपूर्वीचा सापडला पाव
लोकहो! हे कलियुग नाही, तर 'मेघालय युग'; शास्त्रज्ञांनी लावला महत्त्वपूर्ण शोध
ना'पाक' इरादा, दहशतवादी मसूद अजहरचा भारताविरुद्ध नवा कट
सुंदर दिसण्यासाठी तरुणीनं केल्या 200 सर्जरी; खर्च वाचून व्हाल हैराण

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

दोन विमानांची आकाशात टक्कर, 19 वर्षीय भारतीय तरुणीचा मृत्यू
ना'पाक' इरादा, दहशतवादी मसूद अजहरचा भारताविरुद्ध नवा कट
ट्रम्प यांच्यावर टीका, पुतीन यांच्या खोटेपणाला संधी दिली
नवाज शरीफ, मरियम यांचा मुक्काम तुरुंगातच; जामीन अर्ज फेटाळला
Trump-Putin summit: डोनाल्ड ट्रम्प-पुतिन बैठकीत वादमुद्द्याला बगल

आणखी वाचा