ठळक मुद्देया आईचा श्वासोच्छवास जवळपास मिनिटभरासाठी थांबला होता.तिने बाळाला जन्म दिला खरं , पण त्यानंतर जे झाले ते दुर्दैवी होते.आता ती आपल्या मुलालाही ओळखत नाही आणि नवऱ्यालाही ओळखत नाही.

साऊथ वेल्स : आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतात ज्यावर सहसा कोणाचा विश्वास बसत नाही. अंचबित करणाऱ्या या घटना ऐकल्या वाचल्या की जगात चमत्कार नावाच्या गोष्टी आहेत यावर आपला विश्वास बसतो. ब्रिटेनमध्येही अशीच एक चकित करणारी घटना घडली आहे. प्रसुती दरम्यान एका महिलेचा श्वास तब्बल १ तास ८ मिनिटे थांबला होता. श्वास थांबला याचा अर्थ ती महिला मृत पावली असाच होतो. मात्र तरीही १ तास ८ मिनिटांनी ही महिला जागी झाली आणि एका बाळाला जन्म दिला. तुम्हाला कदाचित हे खोट वाटू शकेल. पण यात तथ्य आहे.  

आणखी वाचा - किडनी दानातून तिने दिला मुलाला पुनर्जन्मत्र, सोलापूरातील घटना, यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

ब्रिटेनच्या साऊथ वेल्समध्ये राहणारी २२ वर्षीय शेनॉन या महिलेच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे. डिलिव्हरीच्या वेळेस शेनॉनला अॅम्निओटीक फ्लूयड एम्बॉलिझम या आजाराशी सामना करावा लागला. या आजारामुळे डिलिव्हरीदरम्यान तिचा श्वास थांबला होता. त्यामुळे डॉक्टरांनाही आता नेमकं काय करावं हेच कळत नव्हतं. मात्र ती महिला तासाभराने शुद्धीवर आली. तिने एका छान गोंडस बाळालाही जन्म दिला. पण बाळ जन्माला आल्याच्या दुसऱ्याच मिनिटात शेनॉन कोमामध्ये गेली. शेनॉनची आई निकोला म्हणतात की, ‘शेनॉनला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा आम्ही फार आनंदात होतो. घरी येताना आमच्याकडे छान गोंडस बाळ येणार या आनंदात सारेजण होतो. पण आता आम्हाला दोन लहान मुलांचा सांभाळ करावा लागणार आहे. कारण शेनॉनची आता भरपूर काळजी घेण्याची गरज आहे.’

बाळंतपणानंतर शेनॉन कोमात गेल्यावर दोन आठवड्यांनी शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर मात्र ती सारं काही विसरलेली होती. तिला नवं काहीच आठवत नव्हतं. तिला तिचं वय विचारलं असता, १३ वर्ष वय असल्याचं सांगितलं, आणि १३ वर्षांची असताना शेनॉन ज्या ठिकाणी राहत होती, त्या ठिकाणचा पत्ता ती सांगत होती. तिचं लग्न झालंय, तिला दोन मुलं आहेत, हे काहीच तिला आठवत नव्हतं. त्यामुळे हॉस्पिटलमधून ती थेट तिच्या आईच्याच घरी गेली. तिची आई निकोला याच आता तिची काळजी घेत आहेत. 

आणखी वाचा - अहो! आश्चर्यम,  गायीला झाले जुळे, निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी  

ती सध्या तिच्या आईच्या घरी राहत असून अजूनही गंभीर अवस्थेत आहे. व्यवस्थित चालता येत नसल्याने तिला व्हिलचेअरचा वापर करावा लागतो आहे. तसंच तिला सारं काही आठवावं याकरता तिने तिच्या नवरा व मुलाच्या सानिध्यात तिने राहणं गरजेचं आहे. मात्र ती त्यांना ओळखतच नसल्याने तिनं त्यांच्या सानिध्यात राहणं शक्यच नाही. त्यामुळे तिच्या सासरची मंडळी जिथं राहतात, तिथंच जवळपास खोली घेऊन शेनॉनची स्मृती परत आणण्यात येणार असल्याचं निकोला यांनी सांगितलं. 

सौजन्य - www.mirror.co.uk


Web Title: dead woman gave birth to baby, then become coma patient
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.