दाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 08:07 AM2018-08-19T08:07:14+5:302018-08-19T09:16:10+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला पकडण्यासाठी भारतानं दबाव टाकला आहे. दाऊद इब्राहिमचा डावा हात समजला जाणा-या जबीर मोतीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे.

Dawood's faithful Jaber Moti, arrested from London, big news for India | दाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी

दाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी

Next

नवी दिल्ली- गेल्या अनेक वर्षांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देशाबाहेर पळाला आहे. परंतु त्याचे भारतातल्या अंडरवर्ल्ड माफियांशी असलेले संबंध पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला पकडण्यासाठी भारतानं दबाव टाकला आहे. दाऊद इब्राहिमचा डावा हात समजला जाणा-या जबीर मोतीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी मोतीला शुक्रवारी हिल्टन हॉटेलमधून अटक केली आहे आणि त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं.

मोती हा इंग्लंड, यूएई आणि इतर देशांमध्ये दाऊदचं कामकाज सांभाळतो. भारतानं मोतीला अटक करण्याची मागणी केली होती. मोतीवर ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि इतर गुन्हांमध्ये गंभीर आरोप आहेत. जबीर सिद्दीक ऊर्फ जबीर मोती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू सहकारी आहे. तो दाऊद आणि डी कंपनीसाठी पैशासंबंधित व्यवहार पाहतो. पाकिस्ताननं त्याला नागरिकत्व बहाल केलं आहे. दाऊदची पत्नी महजबीचा सुद्धा त्याच्यावर फार विश्वास आहे. दाऊद सध्या कराचीमधील क्लिफ्टन भागात राहतो.

मोती हा मध्य पूर्व देशांसह ब्रिटन, यूरोप, आफ्रिकेमध्ये दाऊदचं काम पाहतो. सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊदला धंद्यातून झालेला नफा तो दहशतवादी संघटनांना पुरवतो. दाऊदसाठी मोती बनावट भारतीय नोटा, अवैध शस्त्रास्त्रं पुरवठा आणि मालमत्तेसंबंधित व्यवहार पाहतो. कराचीमध्ये त्याचा मोठा बंगला आहे. तो अँटिग्वा व डोमिनिक रिपब्लिकचं नागरिकत्व घेण्याबरोबरच हंगेरीचा कायमस्वरूपीचं नागरिकत्व घेण्यासाठी प्रयत्नशील होता. जबीरकडे इंग्लंडचा 10 वर्षांचा व्हिसा आहे.



 

Web Title: Dawood's faithful Jaber Moti, arrested from London, big news for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.